व्हायरल व्हिडीओ
नवी दिल्ली, 11 मार्च : लोकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अडचणींवर मार्ग शोधत शोधत अनेक लोक जगत असतात. गोष्टींचीही कमतरता भासली तरीही त्यावर काहीतरी उपाय काढतात. गरिब परिस्थितीही अनेकवेळा संकटांवर मात करायला शिकायला लावते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन लहान मुलं गरिबी आणि वंचित राहूनही बॉक्सिंगचा सराव करताना दिसत आहेत. एकंदरीत ते बॉक्सिंग बॅग खरेदी करु शकत नसल्यामुळे त्यांनी हा उपाय त्याच्यावर काढला आहे. त्यामुळे चिमुकले हातात चप्पल घेऊन सराव करताना दिसत आहेत. स्ट्राइकिंगपॅडवर्क नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे.
आजकाल मुले अभ्यासासोबत खेळात आपले भविष्य घडवताना दिसत आहेत. गरिबी आणि टंचाईमुळे, अनेक देशांमध्ये सरकार मुलांना खेळाशी संबंधित काही मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरते. अशा परिस्थितीत तिथे राहणारी मुलं आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जुगाड शोधताना दिसतात.
साधनसामग्रीची कमतरता तसेच गरिबी आणि अभाव असतानाही जुगाड खेळून आपल्या खेळात सुधारणा करणारी ही मुले सोशल मीडियावर वापरकर्त्यांना खूप प्रेरित करत आहेत. ज्याला सोशल मीडियावर 2 लाख 15 हजारांहून अधिक पाहिले गेले आहे. व्हिडिओ पाहून यूजर्स सतत आपल्या प्रतिक्रिया कमेंट करत देत आहेत. मुलांचे कौतुक करताना एका यूजरने लिहिले की, ‘तुम्ही कुठून आलात याने काही फरक पडत नाही. तुम्ही कुठे जात आहात हे महत्त्वाचे आहे.