मराठी बातम्या / बातम्या / Viral / 'ही' हत्तीण खेळतेय चक्क क्रिकेट आणि फुटबॉल! पाहण्यासाठी लोकांची गर्दी, पाहा Video

'ही' हत्तीण खेळतेय चक्क क्रिकेट आणि फुटबॉल! पाहण्यासाठी लोकांची गर्दी, पाहा Video

व्हायरल

प्राण्यांचे मजेदार व्हिडिओ पाहायला बऱ्याच जणांना आवडतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हत्तीचा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.


नवी दिल्ली, 25 मार्च : प्राण्यांचे मजेदार व्हिडिओ पाहायला बऱ्याच जणांना आवडतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हत्तीचा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये गिरिजा उर्फ महालक्ष्मी नावाची 31 वर्षं वयाची हत्तीण काटील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिरात फुटबॉल खेळताना दिसतेय. मंदिराला भेट देणारे भाविक या हत्तिणीसोबत सेल्फी घेताना दिसतात. हे मंदिर कर्नाटकातल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात आहे. 1994 मध्ये काटील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिरात हत्तीण आणण्यात आल्याचं सांगितलं जातं. मंदिरातली ही हत्तीण या भागात खूपच प्रसिद्ध आहे.

फुटबॉल खेळणाऱ्या या हत्तिणीला फैरोज आणि अतलाफ नावाच्या तरुणांनी प्रशिक्षण दिलंय. मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्तीण गेल्या आठ महिन्यांपासून दररोज अंदाजे दोन तासांपेक्षा जास्त वेळ क्रिकेट आणि फुटबॉल खेळते. मंदिर परिसरात काही जण तर केवळ हत्तिणीचा खेळ पाहण्यासाठी येतात.

हेही वाचा -  कुत्र्याचा स्वॅग पाहून व्हाल थक्क, कॅमेरा सुरु करून केलं असं काही...Video Viral

या मंदिरात पूर्वी एक नर हत्ती होता. नागराज असं त्याचं नाव होतं. या हत्तीच्या मृत्यूनंतर महालक्ष्मी नावाची हत्तीण तिथे आणण्यात आली. त्या वेळी महालक्ष्मीचं वय फक्त 5 वर्षं होतं. या हत्तिणीला विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी नियमित प्रशिक्षण दिलं जात आहे. यापूर्वी ही हत्तीण मुलांसोबत क्रिकेट खेळत असल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता.

असा असतो हत्तिणीचा दिनक्रम

मंदिरातल्या हत्तिणीचा दिनक्रम हा ठरला आहे. दररोज सकाळी देवाची पूजा करण्यापूर्वी हत्तिणीला आंघोळ घालण्यात येते. या हत्तिणीला दररोज सकाळी सात वाजता आंघोळ घातली जाते. त्यानंतर सकाळी 10.30 च्या सुमारास गवत, तांदूळ, गूळ, केळी आणि काकडी असा आहार तिला दिला जातो. दुपारी 1.30 वाजता ज्वारीच्या पिठाचे गोळे आणि 2.45 वाजता हिरव्या भाज्या तिला खाऊ घातल्या जातात. दुपारी 3.30 ते 6.30 हा काळ हत्तिणीच्या विश्रांतीचा असतो. रात्री पुन्हा तिला गवत आणि केळी खाण्यास दिली जातात. डॉक्टर दर सहा महिन्यांनी या हत्तिणीची वैद्यकीय तपासणीही करतात.

सध्या मंदिरातल्या या हत्तिणीचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाइक करतानाच त्यावर कमेंटसुद्धा केल्या आहेत. सोशल मीडियावर प्राण्यांच्या मजेशीर व्हिडिओजना खूपच पसंती मिळत असते. अनेक जण असे व्हिडिओ शेअर करतात. अगदी तसाच हा हत्तिणीचा व्हिडिओ वेगानं शेअर केला जात आहे. त्यामुळे या व्हिडिओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

First published: March 25, 2023, 17:03 IST
top videos
  • Ashadhi Wari 2023: महिलांसाठी वारीत खास सुविधा, पाहा कसे असणार नियोजन, Video
  • Nagpur News: विदर्भातील सर्वात मोठं फुलांचं मार्केट माहितीये का? दिवसाला होते 40 लाखांची उलाढाल, Video
  • Wardha News: महात्मा गांधींनी सुरू केलेल्या भांडारातून ताक कधी प्यायला का? Video
  • Pune News : राज्यावर येणार जल संकट, ज्योतिषांनी वर्तवला चिंता व्यक्त करणारा अंदाज VIDEO
  • Pune News : श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींचे अश्व नतमस्तक, पाहा Video
  • Tags:Elephant, Local18, Top trending, Videos viral, Viral

    ताज्या बातम्या

    सुपरहिट बॉक्स