रात्रीच्या वेळी चोरांनी जोडप्याला अडवलं
नवी दिल्ली, 25 एप्रिल : चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. चोरांची दहशत वाढली असून ते दिवसा रात्री कधीही डल्ला मारताना दिसून येतात. त्यामुळे लोक रस्त्यावर फिरताना आपल्या सामानाला घेऊन नेहमीच चिंतेत असतात. सध्या अशीच एक चोरीची घटना समोर आलीये ज्यामध्ये रात्रीच्या वेळी एका कपलला अडवलं. नंतर जे काही घडलं ते धक्कादायक. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे .
व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक जोडपे निर्जन रस्त्यावरून जात आहे. व्हिडीओ पाहता हा रात्रीचा व्हिडीओ असल्याचे दिसते. तेवढ्यात त्या जोडप्याच्या शेजारी एक दुचाकी थांबते. दुचाकीवरून दोन लोक जाताना दिसत आहेत, त्यापैकी एकाने हेल्मेट घातले आहे. हेल्मेट घातलेला बाईकवरून उतरतो आणि सरळ बंदूक दाखवतो. इकडे तो बंदूक दाखवतो, तर दुसरीकडे मुलगा त्याच्या मैत्रिणीला सोडून पळून जातो. तो मागे पळू लागतो. अखेर बाईक चालवणाऱ्या चोरट्याने मुलीचे काही सामान घेतले आणि नंतर बाईकवर बसले. आपला मित्रही पळून गेल्याचं पाहून मुलगी तोंडालाच हात लावते.
हा व्हिडीओ कधीचा आणि कुठचा आहे याची पुष्टी झालेली नाही. पण हा व्हिडीओ जरादार व्हायरल होत आहे. लोक त्या मुलावर नाराज आहेत कारण त्याने आपल्या मैत्रिणीचा जीव वाचवला नाही आणि तिला संकटात सोडून पळून गेला. @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भन्नाट कमेंट पहायला मिळतायेत. अनेकजण त्या मुलाच्या कृत्यावर संताप व्यक्त करत आहेत.