JOIN US
मराठी बातम्या / Viral / दिवसाढवळ्या तरुणीच्या डोळ्यात फेकली धूळ, पाठमोरी होताच भामट्याने पळवली स्कूटी, चोरीचा Shocking Video

दिवसाढवळ्या तरुणीच्या डोळ्यात फेकली धूळ, पाठमोरी होताच भामट्याने पळवली स्कूटी, चोरीचा Shocking Video

एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Shocking Robbery Video Viral) होत आहे. यात स्कूटी चोरी करण्यासाठी चोराने वापरलेली पद्धत पाहून कोणीही हैराण होईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 14 जानेवारी : चोरीचे अनेक व्हिडिओ (Robbery Video) ऑनलाईन शेअर केले जातात. लॉक करण्यात आलेल्या गाड्याही कशा पद्धतीने चोरल्या जातात, हे तुम्हीही पाहिलं असेल. मात्र आता काळ बदलला आहे. लोक लॉक तोडण्याचंही कष्ट आता घेत नाहीत. यामुळे चोरांनी आा चोरी करण्यासाठी नवी पद्धत अवलंबली आहे. याचाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Shocking Robbery Video Viral) होत आहे. यात स्कूटी चोरी करण्यासाठी चोराने वापरलेली पद्धत पाहून कोणीही हैराण होईल. नशीब बलवत्तर म्हणून तरुणाने मृत्यूलाही दिला चकवा; धडकी भरवणारा अपघाताचा VIDEO चोरीचा हा व्हिडिओ फेसबुकपासून इन्स्टाग्रामपर्यंत सगळीकडे शेअर केला जात आहे. यात रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली स्कूटी दिवसाढवळ्या कशा पद्धतीने चोरी करण्यात आली, हे पाहून सगळेच हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती सुरुवातीला रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या स्कूटीचं निरीक्षण करतो. त्याला समजतं की स्कूटी लॉक आहे. मात्र गाडीचं लॉक तोडण्याऐवजी त्याने वेगळीच शक्कल लढवली. त्याने गुपचून स्कूटीच्या सायलन्सरमध्ये एक कापड घातलं.

संबंधित बातम्या

काही वेळाने एक तरुणी स्कूटीजवळ आली आणि गाडी सुरू करू लागली. मात्र, मागे कापड बांधलं असल्याने गाडी सुरूच झाली नाही. यामुळे ही तरुणी वैतागली. इतक्यात चोराने समोरून येत तिला मदतीची ऑफर दिली. सुरुवातीला त्याने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचं नाटक केलं. यानंतर ही मुलगी फोनवर बोलण्यासाठी थोडं दूर जाताच चोराने मागच्या बाजूला लावलेलं कापड काढून टाकलं आणि स्कूटी चालू करून गाडीसह तो तिथून फरार झाला.

…अन् नवरीला सोडून लग्नमंडपातून नवरदेवाने काढला पळ; व्हायरल होतोय हा VIDEO

हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. तर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअरही केला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, सावध राहा सतर्क राहा. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. भरदिवसा रस्त्यावर झालेली ही अजब चोरी पाहून सगळेच हैराण आहेत. व्हिडिओ पाहून असाही अंदाज लावला जात आहे, की हा व्हिडिओ लोकांना सावध करण्यासाठी बनवला गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या