व्हायरल
नवी दिल्ली, 4 एप्रिल : सोशल मीडियावर अनेक धाडसी महिलांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक कठिण आणि किचकट कामं महिला करताना दिसून येतात. यासाठी नेहमीच त्यांच्यावर कौतुकाची थाप पडत असते. अशातच आणखी एका महिलेचा धाडसी व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमधील महिलेचं धाडस पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सोशल मीडियावर पहाडी महिलेचा व्हिडिओ खूप पाहिला जात आहे. या 14 सेकंदाच्या क्लिपमध्ये महिला एका भलामोठ्या झाडावर चढून फांद्या तोडताना दिसत आहे. तिने साडी नेसली आहे आणि झाडाच्या माथ्यावर चढलीये आणि मोठ्या धारदार कोयत्याच्या सहाय्याने झाडाची फांदी कापत आहे. महिलेचं हे धाडस पाहून सर्वच थक्क आहेत. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
@Munsyari_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय ही महिला एवढी उंच कशी चढली हा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर काही लोकांनी सांगितले की हे पहाडी महिलांसाठी सामान्य गोष्ट आहे. गुरांसाठी चारा आणि सरपण गोळा करण्यासाठी ती असा धोका पत्करत असते.
दरम्यान, महिलेचं हे धाडस पाहून अनेकजण कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत. इतक्या उंच झाडावर चढलेली महिला सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अगदी काही वेळात हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यापूर्वीही महिल्यांच्या धाडसाचे बरेच व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.