JOIN US
मराठी बातम्या / Viral / अरेच्चा! बाई आहे की नागिण? जमिनीवर लोळत नाचू लागली महिला, लग्नातील Dance Video

अरेच्चा! बाई आहे की नागिण? जमिनीवर लोळत नाचू लागली महिला, लग्नातील Dance Video

वेगवेगळ्या समारंभातील व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विशेषतः लग्नातील व्हिडीओ. लग्नातील मजा मस्ती करतानाचे अनेक मजेशीर, विचित्र व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात.

जाहिरात

लग्नातील डान्स व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 एप्रिल : वेगवेगळ्या समारंभातील व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विशेषतः लग्नातील व्हिडीओ. लग्नातील मजा मस्ती करतानाचे अनेक मजेशीर, विचित्र व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. अशातच लग्नातील एक डान्स व्हिडीओ समोर आलाय. जो पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. सध्या हा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधत आहे. लग्नातील निरनिराळे डान्स व्हिडीओ समोर येत असतात. यामध्ये अनेक हटके डान्स पहायला मिळतात. नवीन स्टाईल, विचित्र डान्स जणू लग्नाच्या समारंभातील एक फॅशनच झाली आहे. असाच एक महिलेचा लग्नातील डान्स समोर आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ‘मैं नागिन तू सपेरा’ या गाण्यावर एक विवाहित महिला फरशीवर कशी नाचत आहे, तर दुसरी महिला बीन वाजवत तिची साथ देत आहे. महिलेचा हा अंदाज अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. जेव्हा ही महिला जमिनीवर पडून सतत नाचत असते तेव्हा तिथे उपस्थित असलेली दुसरी महिला येऊन तिला तिथून उठवतानाही दिसून आली. महिलेची फरशीवर लोळत डान्स पाहून समारंभातील सर्वच लोक थक्क झाले.

संबंधित बातम्या

neha_ankit26 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा लग्न समारंभातील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामधील महिलेचा डान्स इंटरनेचवर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. असे अनेक विचित्र, हटके डान्स व्हिडीओ यापूर्वीही समोर आलेत मात्र महिलेचा लोळत डान्स सर्वांनांच थक्क करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या