JOIN US
मराठी बातम्या / Viral / Scary Video : शोरुमबाहेरील ट्रॅक्टर अचानक झाला सुरु, काच फोडून आत आला आणि....

Scary Video : शोरुमबाहेरील ट्रॅक्टर अचानक झाला सुरु, काच फोडून आत आला आणि....

कधी कधी कॅमेऱ्यात अशा गोष्टी कैद होतात ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. अनेक वेळा विचित्र, मजेशीर, भयानक गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कैद होतात.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 4 मार्च : कधी कधी कॅमेऱ्यात अशा गोष्टी कैद होतात ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. अनेक वेळा विचित्र, मजेशीर, भयानक गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कैद होतात. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या एक विचित्र घटना समोर आली असून याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शूजचं शोरुम पहायला मिळत आहे. शोरुम शेजारी एक ट्रॅक्टर उभा केला होता. हा ट्रॅक्टर अचानक सुरु झाला अन् शोरुमची काच फोडून आत घुसला. शोरुमच्या कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टला आवरण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रॅक्टर बंद होण्याचा नावच घेत नव्हता. ब्रेक दाबूनही ट्रॅक्टर बंद झाला नाही. ड्रायव्हरशिवाय ट्रॅक्टर फिरताना पाहून शोरूमचे कर्मचारी थक्क झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

संबंधित बातम्या

या विचित्र घटनेबाबत शूज शोरूमचे व्यवस्थापकांनी सांगितलं, कर्मचारी आतमध्ये काम करत होते, तेव्हा चालकाविना ट्रॅक्टर सुरू झाला, एक सायकल आणि दुचाकी तोडून शोरूमचे गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला. यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचे व्यवस्थापकाचे म्हणणे आहे. त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांना धडकीच भरली, भूत असल्याचाही संभ्रमही निर्माण झाला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंटदेखील येत आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ @SKkhare11 या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या