JOIN US
मराठी बातम्या / Viral / चक्क घोड्यावर आला चोर, महिलेची बॅक हिसकावू लागला अन्..., Video व्हायरल

चक्क घोड्यावर आला चोर, महिलेची बॅक हिसकावू लागला अन्..., Video व्हायरल

आजकाल चोर, दरोडेखोरांची दहशत वाढत चाललेली पहायला मिळत आहे. रात्री, दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांचंही प्रमाण अधिक झालं आहे.

जाहिरात

व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 एप्रिल : आजकाल चोर, दरोडेखोरांची दहशत वाढत चाललेली पहायला मिळत आहे. रात्री, दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांचंही प्रमाण अधिक झालं आहे. त्यामुळे लोकांच्या मनात चोरांची भीती वाढत चालली आहे. चोरीच्या अनेक धक्कादायक घटना आणि त्यांचे व्हिडीओ समोर येत असतात. अशातच आणखी एक चोरीची घटना समोर आली असून याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजकाल असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्याने लोक हैराण झाले आहेत. एक चोर घोड्यावर बसून येतो आणि खाली रस्त्यावरून जात असलेल्या महिलेला लुटतो आणि आरामात निघून जातो.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीची वेळ आहे आणि एक महिला एका निर्जन भागातून कुठेतरी जात आहे, त्याच दरम्यान घोड्यावर स्वार असलेला एक माणूस तिथे पोहोचतो. त्याला पाहून ती महिला मागे वळते आणि पळून जाण्याचा प्रयत्न करते, परंतु चोर तिला पळून जाण्याची संधी देत ​​नाही. तो जबरदस्तीने महिलेकडून तिची बॅग हिसकावून घेतो आणि तेथून आरामात पळून जातो आणि ती महिला बघतच राहते. हेही वाचा  -   खेळण्यातल्या माकडाच्या पिलाला मेलेलं समजून वानरांनी वाहिली श्रद्धांजली, पाहा Video या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ @HasnaZarooriHai नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. 15 सेकंदांच्या व्हिडीओवर भरपूर कमेंट येताना पहायला मिळत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मजेशीरपणे लिहिले आहे की, मुलींना वाटते की एक दिवस त्यांच्या स्वप्नांचा राजकुमार घोड्यावर बसून येईल, तर प्रत्यक्षात काहीतरी असेच घडते. दरोडेखोर घोड्यावर स्वार होऊन येतो.

संबंधित बातम्या

दरम्यान, अशा विचित्र घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी काय व्हायरल होईल आणि कोण प्रसिद्धी झोतात येईल याविषयी काहीच सांगता येत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या