JOIN US
मराठी बातम्या / Viral / चुकून पुरुषाचा धक्का लागला अन् महिला जिंकली 75 कोटी!

चुकून पुरुषाचा धक्का लागला अन् महिला जिंकली 75 कोटी!

कोणाचं नशीब कधी उघडेल हे सांगणं केवळ अशक्य आहे. काही व्यक्ती आयुष्यभर कठोर मेहनत करतात, तरीदेखील त्यांना अपेक्षित सुख-समृद्धी, पैसा मिळत नाही. काही व्यक्ती मात्र अशा असतात, की ज्यांना काहीही न करतादेखील एक दिवस अचानक मोठा धनलाभ होतो.

जाहिरात

गुंतवणूक करून व्हा लखपती. (प्रतीकात्मक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 एप्रिल : कोणाचं नशीब कधी उघडेल हे सांगणं केवळ अशक्य आहे. काही व्यक्ती आयुष्यभर कठोर मेहनत करतात, तरीदेखील त्यांना अपेक्षित सुख-समृद्धी, पैसा मिळत नाही. काही व्यक्ती मात्र अशा असतात, की ज्यांना काहीही न करतादेखील एक दिवस अचानक मोठा धनलाभ होतो. अशीच एक घटना अमेरिकेत (America) घडली आहे. तिथल्या एका महिलेला (Women) एका पुरुषाचा (Men) चुकून धक्का लागला आणि या महिलेनं 75 कोटी रुपयांची लॉटरी (Lottery) जिंकली आहे. ही घटना ऐकून तुम्हाला कदाचित खोटं वाटेल; पण हे खरं आहे. `आज तक`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मेट्रो आणि ABC7ने दिलेल्या वृत्तानुसार, लाक्वेडरा एडवर्ड्स (Laquedra Edwards) असं या महिलेचं नाव आहे. या महिलेनं कॅलिफोर्निया लॉटरी व्हेंडिंग स्क्रॅचर्स व्हेंडिंग मशीनमध्ये सुमारे तीन हजार रुपये लावले होते. ती तिच्या आवडीचा गेम (Game) निवडणार होती. तितक्यात एका पुरुषाचा तिला मागून धक्का लागला. त्यामुळे या महिलेकडून मशीनचं चुकीचं बटण दाबलं गेलं; पण ही चूक तिच्यासाठी भलतीच सुखद ठरली. कारण यामुळे तिला 75 कोटींची लॉटरी लागली. तिनं ही लॉटरी कॅलिफोर्नियातल्या (California) टारझाना (Tarzana) इथल्या वोन्स सुपरमार्केटमधून खरेदी केली होती. नोव्हेंबर महिन्यात या महिलेसोबत ही घटना घडली. जेव्हा एका पुरुषानं तिला मागून धक्का दिला तेव्हा ती विजयी क्रमांकावर सट्टा लावण्याचा प्रयत्न करत नव्हती; पण पुरुषानं धक्का दिल्यानं तिच्याकडून अचानक बटण दाबलं गेलं आणि लॉटरीचं तिकीट निघालं. आपण एवढी मोठी रक्कम जिंकली आहे, यावर लाक्वेडराचा अजूनही विश्वास बसलेला नाही. बुधवारी (6 एप्रिल) या प्रकरणी कॅलिफोर्निया लॉटरीची बाजू स्पष्ट झाली. त्यानुसार ती म्हणाली, `तो पुरुष अचानक आला आणि त्याची माझ्याशी टक्कर झाली. तो काहीच न बोलता अचानक निघून गेला.` हे ही वाचा- कपलने FB वर शेअर केला अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घराचा फोटो; नेटकऱ्यांना दिसलं भीतीदायक दृश्य ती जेव्हा तिच्या कारजवळ पोहोचली तेव्हा तिनं सुमारे 2200 रुपयांची तिकिटं स्क्रॅच केली. त्यानंतर आपण 75 कोटी जिंकल्याचं तिला समजलं. एका क्षणी तिला यावर विश्वास बसला नाही. त्यामुळे ती वारंवार तिकिटं तपासून पाहत होती. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर तिने त्या रकमेचं प्लॅनिंगदेखील शेअर केलं आहे. `या रकमेतून मी एक घर खरेदी करणार असून, एक एनजीओदेखील (NGO) सुरू करणार आहे,` असं तिने सांगितलं.

संबंधित बातम्या

खरं तर त्या घटनेमुळे ती त्या वेळी काहीशी नाराजही झाली होती. ती म्हणाली, `मला कमी रकमेच्या लॉटरीवर खर्च करायचा होता; पण टक्कर झाल्यामुळे मला मी ठरवलेल्या रकमेपेक्षा 75 टक्के अधिक रक्कम खर्च करावी लागली. खरं तर, मी सहसा लॉटरीवर कमी खर्च करते.`प्रत्यक्षात मात्र तेव्हा तिचा खर्च जास्त झाला असला, तरी पुढे तिला प्रचंड मोठ्या रकमेची लॉटरी लागल्याने तो खर्च अगदी पुरेपूर वसूल झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या