व्हायरल बातम्या
नवी दिल्ली, 8 एप्रिल : नवरा बायकोच्या प्रेमाच्या, भांडणांच्या, रागाच्या, मजेशीर, अशा अनेक घटना समोर येत असतात. आपण विचारही करु शकत नाही अशा भयानक घटनाही समोर येत असतात. सध्या समोर आलेली नवरा बायकोची घटना ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. ही घटना सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. पती दुसऱ्या देशात काम करत होता आणि पत्नीला लॉटरी लागली आणि तिने इकडे दुसरं लग्न उरकल्याचा प्रकार समोर आलाय. चर्चेत येणारं हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
नरिन नावाच्या 47 वर्षीय व्यक्तीने 11 मार्च रोजी आपल्या पत्नीविरुद्ध खटला दाखल केला होता. या व्यक्तीने 20 वर्षांपूर्वी महिलेशी लग्न केले असून त्यांना तीन मुली आहेत. थायगरमधील वृत्तानुसार, नरिनवर 2 दशलक्ष बाह्त (थाई चलन) कर्ज होते. अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड करता यावी म्हणून या जोडप्याने 2014 साली कामासाठी दक्षिण कोरियाला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, नरिनने नंतर दक्षिण कोरियात काम सुरू ठेवले. तर त्याची पत्नी चाविवान मुलांची काळजी घेण्यासाठी थायलंडला परतली. यावेळी, नरिनने कुटुंब चालवण्यासाठी दरमहा सुमारे 27,000 ते 30,000 बाह्त चलन पाठवले. हेही वाचा - सासूचं जावयावरच जडलं प्रेम; मुलीऐवजी स्वतःच साजरा केला हनीमून, गरोदर राहिली आणि…. नरिनला नंतर कळते की त्याच्या पत्नीने 2.9 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आणि तिने त्याच्यापासून ही गोष्ट लपवली. त्याने तिला अनेक कॉल केले, जेव्हा कॉल्सचे उत्तर आले नाही तेव्हा त्याने 3 मार्च रोजी थायलंडला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे पोहोचल्यावर त्याला कळले की 25 फेब्रुवारीला त्याच्या पत्नीने एका पोलीस अधिकाऱ्याशी लग्न केले आहे. नरिनने सांगितले की, मला धक्का बसला आणि मला काय करावे हे समजत नव्हते. मी खूप निराश झालो. 20 वर्षांनंतर माझी पत्नी मला फसवेल अशी मला अपेक्षा नव्हती. माझ्या बँकेत माझ्याकडे एकूण 60,000 बाह्त शिल्लक आहे कारण मी तिला दरमहा पैसे पाठवत आहे. मला न्याय आणि माझा हक्क असलेल्या पैशाची मागणी करायची आहे. दरम्यान, अशा अनेक विचित्र आणि धक्कादायक घटना घडत असतात. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा बातम्या लवकर चर्चेत येतात. यापूर्वीही असे नवरा बायकोची प्रकरणे समोर आली आहेत.