JOIN US
मराठी बातम्या / Viral / पुण्यातील रस्त्यांवर हातात शस्त्र घेऊन फिरणाऱ्या गुंडांची दहशत; काळजाचा थरकाप उडविणारा VIDEO

पुण्यातील रस्त्यांवर हातात शस्त्र घेऊन फिरणाऱ्या गुंडांची दहशत; काळजाचा थरकाप उडविणारा VIDEO

या गुंडानी धारदार शस्त्राने एकाच्या डोक्यावर जबर वार केल्याने ती व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 4 जुलै : पुण्यातील (Pune) पिंपरी-चिंचवड शहरातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. येथे गुंडांच्या दहशतीचा काळजाचा थरकाप उडविणारा एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन फिरताना दिसत आहेत. ते समोर दिसेल त्याच्यावर वार करीत आहेत. सांगवी परिसरातील पिंपळे निळखमध्ये काल रात्री हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Shocking viral video) दारूच्या नशेत असलेले हे तरुण आपल्या हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यामध्ये गोंधळ घालत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहन चालकांना धमाकून त्यांच्यावर वार करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान या धक्कादायक प्रकारात प्रतीक खरात आणि चेतन जावरे नामक तरुणांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबधित दोन्ही तरुण फरार झाले आहेत आणि त्यातील एका व्यक्तीविरोधात एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आणि दहशत पसरविण्यासाठी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिली आहे. 

VIDEO पाहा

अशा प्रकारे दहशत माजविण्याऱ्या या दोन्ही तरुणांवर या आधी कोणताही गुन्हा दाखल नाही किंवा ते कोणत्या गुन्हेगार टोळीशी संबधितही नाहीत. त्यांनी दारूच्या नशेत हे कृत्य केलं असावं असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे ही वाचा- VIDEO : क्षुल्लक कारणावरुन आर्मीचा जवान भडकला; रागाच्या भरात एकाचा जीवच घेतला असं असलं तरीही या आरोपींनी त्यांच्याकडील धारदार शस्त्राने एकाच्या डोक्यावर जबर वार केल्याने तो व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. रस्त्यांवर गर्दी असतानाही हे गुंड धारदार शस्त्र घेऊन फिरत होते. अशा वेळी पोलीस यंत्रणा कुठे होती? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या