JOIN US
मराठी बातम्या / Viral / भयंकर! रस्त्यावरील खांबाला हात लावताच 6 वर्षांच्या मुलाला विजेचा झटका; घटनेचा Live Video कैद

भयंकर! रस्त्यावरील खांबाला हात लावताच 6 वर्षांच्या मुलाला विजेचा झटका; घटनेचा Live Video कैद

विजेच्या झटक्याचा एक Live Video समोर आला आहे. या घटनेनंतर अनेक जण मदतीसाठी धावले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राजस्थान, 13 सप्टेंबर : राजस्थानमधील (Rajasthan News) चुरू जिल्ह्यातील सादुलपूर तालुक्यातील एक नुंहद येथील वीज विभागाच्या निष्काळजीपणामुळे एका 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वृत्त (Shocking Live Video) समोर आलं आहे. विजेच्या झटक्याचा एक Live Video समोर आला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा भयावह व्हिडीओ जवळील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या अपघातानंतर भागात एकच गोंधळ उडाला. (Terrible negligence 6 year old boy electrocuted while walking down the street Live video) ही घटना शनिवारी दुपारी 12 वाजून 21 मिनिटांनी घडली. गावातील दोन मुलं रस्त्यावरुन जात होते. काही वेळापूर्वी गावात पाऊस झाला होता. दोघांपैकी एक मुलाने रस्त्यावरील विजेच्या खांबाला हात लावला. त्यानंतर काही सेकंदात मुलाला करंट लागला आणि तो खाली कोसळला. काही वेळानंतर त्याच्या शरीरातून धूर येऊ लागला. त्यावेळी काहीजण मुलाच्या मदतीसाठी धावले. त्यापैकी एक व्यक्ती लाकडाची फळी घेऊन आला व त्याने मुलाला खांबापासून दूर लोटलं. मात्र तोपर्यंत मुलगा बेशुद्ध झाला होता.

हे ही वाचा- भररस्त्यात तरुणाने पत्नीचे कपडे फाडले; संशयातून अशी अवस्था, VIDEO पाहून हादराल गावातील वकील अशोक सिंह राठोड यांनी सांगितलं की, शनिवारी दुपारी 6 वर्षीय आदिल एका अन्य मुलासह रस्त्यावरून जात होता. रस्त्याजवळ विजेचा खांब होता. त्या मुलाने खांबाला हात लावला आणि काही सेंकटात त्याला विजेचा झटका लागून तो जमिनीवर कोसळला. त्यावेळी अनेक जण मदतीसाठी पुढे आले. गावातील रहिवासी अमित पुनिया यांनी लाकडाची फळी आणली व त्याला खांबापासून दूर लोटलं. त्यांनी आदिलचा जीव वाचवला. या घटनेनंतर तेथे गोंधळ उडाला. लोक त्याच्या अंगावर माती चोळत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर एका खासगी वाहनाने मुलाला गंभीर अवस्थेत पिलानी रुग्णालयात नेण्यात आलं. येथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. सुदैवाने तो यातून बचावला आहे. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या