तैवानमधील भूंकपाचे व्हिडीओ.
तैपेई, 18 सप्टेंबर : महाराष्ट्रात गेले काही दिवस पावसाने थैमान घातलं आहे. दुसरीकडे तैवानमध्ये भूकंपाने हाहाकार माजवला आहे. भूंकपामुळे तैवान हादरलं आहे. भूकंपामुळे तैवानमधील बरीत ठिकाणं उद्ध्वस्त झाली आहेत. भूंकपाने हादरलेल्या तैवानचे भयंकर व्हिडीओ समोर आले आहेत. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येईल. दक्षिण पूर्व परिसरात शनिवारी भूंकपाचे तीव्र धक्के बसले आहेत.सलग दुसऱ्या दिवशी भूंकप झाला आहे. शनिवारनंतर आज रविवारी दुपारी पुन्हा भूकंपाचा झटका बसला. दुपारी 12.14 वाजताच्या सुमारास यूजिंगमध्ये भूकंपाचे धक्के जाणावले. गेल्या दोन दिवसांत 100 पेक्षा जास्त भूकंपाचे धक्के बसले आहेत.
हुआलियन आणि टाइटुंहला भूकंपाचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. तैवानच्या न्यूज एजन्सीनुसार टाइटुंग क्षेत्रात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. हा केंद्रबिंदू जमिनीपासून १० किलोमीटर अंतरावर होता. भूंकपाची तीव्रता 7.2 आहे.
भूकंपामुळे तैवानमध्ये बरंच नुकसान झालं आहे. या भूकंपाची तीव्रता दाखवणारे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात धरती फाटल्याचं दिसतं आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत.
कित्येक ठिकाणी इमारती कोसळल्या आहेत. अख्ख्याच्या अख्ख्या इमारती पत्त्यासारख्या कोसळून जमिनीवर पडल्या. पूलही तुटले आहेत. जणू रस्तेच गायब झाले आहेत. हे वाचा - बापरे! पक्षी धडकताच आकाशातून घरांवर कोसळलं भलंमोठं विमान; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO ट्रेनचेही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात इतकी मोठी ट्रेन जागच्या जागी हलताना दिसते आहे. काही ठिकाणी ट्रेनच्या ट्रेन पलटी झाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार या भूंकपानंतर त्सुनामीचा अलर्ट दिला आहे. यूएसच्या इशाऱ्यानुसार तैवानच्या सागरी किनाऱ्यावर खतरकान त्सुनामीच्या लाटा येऊ शकतात. तर जपानच्या हवामान विभागाने सांगितलं की एक मीटर उंच त्सुनामीची लाट असू शकते. भूकंप आल्यास काय करावं? भूकंप आला असताना जर तुम्ही घरात असाल तर खाली जमिनीवर/फरशीवर बसा. घरात टेबल किंवा फर्निचर असेल तर त्याच्या खाली बसा आणि हातानं आपलं डोकं झाकून घ्या. भूकंपाचे हादरे जाणवत असताना घरातच थांबा आणि सगळं शांत झाल्यावरच बाहेर या. भूकंपाच्या दरम्यान घरातील सर्व लाईट बंद करून ठेवा. हे वाचा - China Building Fire Video - पाहता पाहता 42 मजले आगीच्या विळख्यात; गगनचुंबी इमारत जळून खाक भूकंप आल्यावर काय करू नये? भूकंप आलेला असताना जर तुम्ही घराच्या बाहेर असाल तर उंच इमारती आणि विजेच्या खांबापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. भूकंपाच्या वेळी तुम्ही घरात असाल तर बाहेर निघू नका. जिथे आहात तिथेच स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा. भूकंप आलेला असताना जर तुम्ही घरात असाल तर दरवाजे, खिडक्या आणि भितींपासून दूर राहा. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर चुकूनही करू नका.