मुंबई, 31 डिसेंबर : आईचं प्रेम, हिंमत, धाडस तिची शक्ती याबाबत काही वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या मुलावर कोणतंही संकट येवो. आई आपला जीव धोक्यात घालूनही मुलाला त्या संकटातून बाहेर काढते (Mother saved child video). असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका आईने आपल्या चिमुकल्याचा सुपरमॉम बनून जीव वाचवला आहे (Supermom saved child video). इमारतीच्या एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर कोसळलेल्या मुलाला आईने अशा पद्धतीने वाचवलं आहे, जणू तिच्या अंगात एक वेगळीच शक्ती संचारली. तिला पाहताच सुपरमॉम अशीच प्रतिक्रिया तोंडावर येईल. व्हिडीओत पाहू शकता, एका लिफ्टमधून एक महिला बाहेर पडते. तिच्यासोबत तिचा लहान मुलगाही असतो. त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती असते. लिफ्टबाहेर येताच हे तिघंही एका ठिकाणी उभे असतात. हे वाचा - तरुणीचे केस कापताना हेयर स्टाइलिस्टने कात्रीऐवजी उचललं लायटर आणि…; VIDEO VIRAL त्याचवेळी तिथं एक छोटीशी बाल्कनी असते. मुलगा तिथं जातो. आधी गुडघ्यावर हात टेकवून खाली वाकत समोर पाहत राहतो. अचानक त्याचा तोल ढासळतो आणि तो ग्रीलमधून बाहेर पडतो. त्या पडताना पाहताच त्याची आई धावत येते, उडी मारत ती आपल्याला चिमुकल्याला धरायला जाते.
त्यानंतर आजूबाजूचे लोक ते सर्व पाहतात आणि तिच्या मदतीला धावत येतात. त्या महिलेसोबत असलेली व्यक्ती जिन्यांवरून पळत खालच्या मजल्यावर जाते. चिमुकला खालीच पडला असावा असं वाटतं. पण सुदैवाने त्याच्या आईने सुपरमॉमसारखं त्याला वाचवलं. एका हातात त्याचा पाय धरून ठेवला. त्यानंतर इतर लोकांच्या मदतीने त्याला तिथून वर खेचण्यात आलं. हे वाचा - VIDEO - OMG! छोट्याशा कासवाची डेअरिंग पाहा! थेट मगरीच्या जबड्यातून हिसकावला घास memewalanews इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या आईला सॅल्युट केलं जातं आहे. व्हिडीओवर खूप कमेंट येत आहेत.