व्हायरल व्हिडीओ
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : प्रत्येक मुलगा आणि मुलीसाठी लग्नाचा दिवस खूप खास असतो. दोन वेगवेगळ्या विचारांची माणसं एकत्र येतात आणि संपूर्ण आयुष्य सोबत काढण्याचा विचार करतात. लग्नातील अनेक खास क्षणाचे फोटो व्हिडीओदेखील ते शेअर करतात. काही लग्नातील फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या अशाच एका लग्नातील व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील भावूक झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओमध्ये हार घालण्यासाठी वधू-वर स्टेजवर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रथम वधूने वराला हार घातला आणि नंतर वराने अतिशय हळुवारपणे वधूच्या गळ्यात हार घातला. यानंतर, विधीचा एक भाग म्हणून, मुलगी तिच्या नवरदेवाच्या पाया पडते. त्यानंतर लगेचच वर स्वतः खाली वाकतो आणि वधूच्या पायावर डोके ठेवतो. हे पाहून मुलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. मुलीच्या आयुष्यातील हा खूप खास क्षण असतो जेव्हा मुलगादेखील तुला तेवढीच समान आदर देतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
@Navayan नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसून आला. अनेक प्रतिक्रियादेखील या व्हिडीओवर येत आहेत. अनेकजण नवरदेवाच्या या कृतीचं कौतुक करत आहेत.
दरम्यान, जुन्या काळात लग्नासारख्या संस्थेत पती-पत्नी समान मानले जात नव्हते, पण आता काळ बदलला आहे. पती-पत्नी केवळ अभ्यास आणि नोकरीत एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत, तर घरातील कामांमध्येही त्यांचे समान योगदान पहायला मिळते. असे अनेक खास आणि भावूक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.