लग्नातील विचित्र व्हिडीओ
नवी दिल्ली, 18 मे : लग्नाचे अनेक निरनिराळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक, भावुक व्हिडीओ समोर येतात. अनेकवेळा वधू वराच्या विचित्र गोष्टीही या व्हिडीओमुळे समोर येतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर काही वेळातच धुमाकूळ घालतात. नुकताच लग्नातील एक विचित्र व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये वधूचं वागणं पाहून सर्वच थक्क झालेत. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, वधू आणि वर एकमेकांना हार घालत असताना अचानक वधू मागे वळून बघू लागते. जे पाहून सगळेच थक्क झाले आहेत. त्याचवेळी वधूपक्षातील काही लोक येऊन तिला पकडतात. हा व्हिडीओ पाहून अनेकडण घाबरले देखील आहे.
वेडिंग मेमरीच नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिव्हिडिओ पाहून एका यूजरने गंमतीत ‘भूत लग गया’ असे लिहिले. त्याच वेळी, काही वापरकर्ते म्हणतात की वधूला एपिलेप्टिक फिट आहे. एका यूजरने लिहिले आहे की, एपिलेप्टिक फिट असताना हात आणि पाय फिरतात. आणखी एका युजरने लिहिले की, कदाचित वधूला तिचा वर आवडला नसेल, म्हणूनच ती असे करत आहे.डीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंटचा पाऊस पहायला मिळत आहे. अशा वेगवेगळ्या कमेंट व्हिडीओवर येत आहे.
दरम्यान, वधूला नेमकं काय झालं आणि हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे स्पष्ट झालं नाही. यापूर्वीही लग्नमंडपात वधू किंवा वराचं असं विचित्र वागणं समोर आलं आहे. ज्यामुळे लग्नांमध्ये एकच खळबळ उडाली. सोशल मीडिया माध्यमांवर असे व्हिडीओ कायमच गराळा घालताना दिसतात.