JOIN US
मराठी बातम्या / Viral / शाळेत मोबाईल वापरण्याची विद्यार्थ्यांना खतरनाक शिक्षा; संतप्त शिक्षिकेने आगीत फेकले...

शाळेत मोबाईल वापरण्याची विद्यार्थ्यांना खतरनाक शिक्षा; संतप्त शिक्षिकेने आगीत फेकले...

शाळेत विद्यार्थ्यांकडे मोबाईल सापडताच शिक्षिकेने अशी शिक्षा दिली ज्याचा कुणी विचारही केला नसेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जकार्ता, 23 फेब्रुवारी : कोरोना काळात मुलांचं बहुतेक शिक्षण हे मोबाईलवरच झालं. ऑनलाइन शाळांमुळे मुलांच्या हातात मोबाईल जास्त वेळ राहू लागला. कोरोना काळात शिक्षणात मोबाईलची जरी मदत झाली असली तरी मोबाईलचा वापर मुलांसाठी योग्य नसल्याने शाळेत मोबाईलवर बंदी असते (Punishment for student mobile use in school). शाळेत विद्यार्थ्यांना मोबाईल वापरायला दिला जात नाही. पण काही विद्यार्थी हे लपूनछपून मोबाईल वापरतात आणि मग त्याची शिक्षा त्यांना मिळते. शाळेत मोबाईल वापरताना पकडल्या गेलेल्या अशाच विद्यार्थ्यांना एका संतप्त शिक्षिकेने भयंकर शिक्षा दिली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Teacher throw mobile in fire). शाळेत मुलं लपूनछपून मोबाईल वापरत असतील आणि शिक्षकांनी ते पाहिलं तर त्यांच्याकडून मोबाईल काढून घेतला जातो. तो जप्त केला जातो आणि नंतर त्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्याकडे त्यांच्या पाल्याची तक्रार करून मोबाईल त्यांच्या स्वाधीन केला जातो. पण या प्रकरणात शिक्षिकेने असं काहीच केलं नाही. तिने या विद्यार्थ्यांना अशी शिक्षा दिली जी पाहून सर्वजण हैराण झाले आहेत (Teacher throw iphone in fire). हे वाचा -  Video : सर्वांना सळो की पळो करून सोडलं; बैलांच्या कळपावर भारी पडला एकटा पक्षी fakta.indo इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  व्हिडीओत पाहू शकता काही शाळेचे विद्यार्थी दिसत आहेत आणि एक महिला शिक्षिका आहे. समोर एका ड्रममध्ये आग लावलेली आहे. शिक्षिका या आगीत मोबाईल फेकताना दिसते आहे. एक-दोन नव्हे तर एकेएक करत ती असे बरेच मोबाईल या आगीत फेकते. त्याचवेळी तिला पाहून आणखी एक शिक्षिका येते, तीसुद्धा या आगीत मोबाईल टाकते.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ इंडोनेशियातील एका बोर्डिंग स्कूलमधील आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या शिक्षिकेला फ्लेम थ्रोअर बोललं जात आहेत. आगीत जे मोबाईल भस्म करण्यात आले ते आयफोन होते. इतक्या महागड्या फोन्सची या शिक्षिकेने राख केली आहे. हे वाचा -  वर्ल्ड रेकॉर्डसाठी हाय हिल्स घालून दोरीवर चढली महिला आणि…; धडकी भरवणारा VIDEO काही युझर्सनी याचं समर्थन केलं आहे. बोर्डिंग स्कूलमध्ये मोबाईल नेऊ नये, हे माहिती असताना पालक आपल्या मुलांना इतके महागडे फोन देऊन स्कूलमध्ये का पाठवतात?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर काहींनी शिक्षिकेच्या अशा कृत्यावर टिका केली आहे. शिक्षिकेने हे फोन पालकांच्या स्वाधीन करायला हवे होते, असं त्यांनी म्हटलं आहे.  ही शिक्षा खूप कडक असल्याचं म्हणत जर मोबाईल आणण्याची अशी शिक्षा असेल तर इतर चुकीसाठी काय शिक्षा असेल, असाही सवाल लोकांनी विचारला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या