JOIN US
मराठी बातम्या / Viral / मगरींमध्ये 2 तास सुरू होती लढाई, जबडा पकडून एकमेकींना लोळवलं; 8 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला VIDEO

मगरींमध्ये 2 तास सुरू होती लढाई, जबडा पकडून एकमेकींना लोळवलं; 8 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला VIDEO

दक्षिण कॅरोलिनामध्ये (South Carolina) या एकमेकींशी लढणाऱ्या मगरी (Alligators Fight) कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत. हा व्हिडीओ पाहताना अंगावर भीतीयुक्त शहारा येतो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दक्षिण कॅरोलिना, 29 मे : सोशल मीडियावर व्हायरल होणारे प्राण्यांचे व्हिडीओ अत्यंत अचंबित करणारे असतात. काही वेळा भीतीदायक तर अंगावर काटा आणणारे देखील असतात. दोन मगरींचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून शहारा येतो. दक्षिण कॅरोलिनामध्ये (South Carolina) या एकमेकींशी लढणाऱ्या मगरी (Alligators Fight) कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत. ही घटना हिल्टन हेड लेकजवळ असणाऱ्या द गोल्फ क्लबमध्ये घडली आहे. हा व्हिडीओ गेल्या आठवड्यातील गुरूवारी शेअर करण्यात आला होता. फॉक्स 35 च्या माहितीनुसार ही लढत सुमारे 2 तास चालली. यावेळी मॅथ्यू प्रोफिट याठिकाणी मित्रांबरोबर गोल्फ खेळत होता. त्यावेळी प्रोफिटने हा व्हिडीओ शूट केला आहे. (हे वाचा- बाप रे! रेड झोनमधून आलेला घोडासुद्धा माणसाप्रमाणं झाला क्वारंटाइन ) गोल्फ क्लबने प्रोफिटचा हा व्हिडीओ त्यांच्या पेजवरून शेअर केला आहे.

प्रोफिटने अशी प्रतिक्रिया दिली होती की, ‘या मगरी काही वेळासाठी अशाच पडून होत्या. त्यानंतर त्यांनी एकमेकांचा जबडा पकडला आणि त्यांनी एकमेकांना इकडे-तिकडे ढकलू लागल्या. असं वाटत होतं की त्या एकमेकांना आपापली शक्ती दाखवत आहेत. ही लढाई जवळपास 2 तास सुरू होती.’ (हे वाचा- शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याला कुत्र्यांनं शिकवला धडा, पाहा VIDEO ) हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास 8 लाख युजर्सनी पाहिला आहे. त्याचप्रमाणे 12 हजारपेक्षा अधिक जणांनी शेअर देखील केला आहे. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहताना व्हिडीओचा आवाज वाढवायला विसरू नका. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी घाबरल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी तर ‘परत गोल्फ खेळणार नाही’ अशी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या