14 वर्षात 2500 विषारी सापांची सुटका करणारा 'स्नेक मॅन'
बिकानेर, 29 मे : विषारी सापांचे नाव ऐकताच लोक घाबरतात आणि त्यांना मारण्यासाठी हल्ला करतात. राजस्थानमधील बिकानेर येथील मोहम्मद इक्बाल गेल्या 14 वर्षांपासून सापांचे प्राण वाचवत आहेत. सर्पमित्र असलेला मोहम्मद इक्बाल शहराच्या कानाकोपऱ्यात जाऊन सापांचे प्राण वाचवण्याचे काम करतो. विशेष म्हणजे इक्बाल साप पकडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. सर्पांबाबत असलेल्या आपुलकी आणि प्रेमापोटी तो हे काम फुकटात करतो आहे. इक्बालने सांगितले की, त्याने आतापर्यंत बिकानेरमध्ये 2,500 साप पकडले आहेत. याशिवाय त्याने जवळपास 200 आयरिश प्रजातीचे साप पकडले आहेत. त्याने सांगितले की, कोणाच्या घरी, दवाखान्यात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी साप असल्याची माहिती मिळताच मी तात्काळ तेथे पोहोचतो आणि त्या सापाला पकडतो. ज्यामुळे मानव आणि साप दोघांचेही प्राण वाचतात. नंतर सुटका केलेल्या सापाला वनविभागाच्या ताब्यात दिले जाते. अनेक वेळा या सापांना वनक्षेत्रात नेऊन सोडले जाते. साप पकडण्याचे देतो मोफत प्रशिक्षण: इक्बालने सांगितले की, मी अनेकांना साप पकडायला शिकवले आहे. या कामासाठी मी कोणतेही शुल्क घेत नाही. साप हा निसर्गासाठी फायदेशीर प्राणी आहे, त्यामुळे त्याची हत्या करू नये. साप दिसल्यावर त्याला वाचवावे किंवा पकडून सुरक्षित ठिकाणी सोडावे. सर्पप्रेमी मोहम्मद इक्बाल यांनी सांगितले की, लहानपणी त्याने लोकांना साप मारताना पाहिले होते, मग त्याला वाटले की लोक या मुक्या प्राण्याला का मारत आहेत. तेव्हापासून इक्बालने सर्पमित्र म्हणून काम सुरु केले.