JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - स्कूटीच्या फ्रंट पार्टमधून येत होता विचित्र आवाज; उघडताच फणा काढून उभा राहिला साप आणि...

VIDEO - स्कूटीच्या फ्रंट पार्टमधून येत होता विचित्र आवाज; उघडताच फणा काढून उभा राहिला साप आणि...

स्कूटीच्या फ्रंट पार्टमध्ये खतरनाक साप बसला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 ऑगस्ट : पावसाळ्यात गाड्यांच्या समस्या तशा बऱ्याच उद्भवतात. अशाच एका तरुणीलाही तिच्या स्कूटीतून विचित्र आवाज येत होता. गाडीत नेमकी काय समस्या आहे हे पाहण्याचा तिने प्रयत्न केला तेव्हा जे दिसलं ते पाहून ती घाबरलीच. त्या गाडीत चक्क एक साप होता. फ्रंट पार्ट उघडताच हा साप फणा काढून उभा राहिला आणि पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पावसाळ्यात बऱ्याच छोट्या-छोट्या खतरनाक प्राण्यांचा धोका असतो. कधी, कुठे, कोणता प्राणी लपलेला असेल सांगू शकत नाही. काही दिवसांपूर्वी एका बुटात साप लपून बसल्याचं समोर आलं होतं आणि आता एका स्कूटीत लपलेल्या सापाचा व्हिडीओ समोर आला आहे. स्कूटीचा पुढील भाग असतो. त्यात हा साप लपून बसला होता. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. एका छिद्रातून साप वर डोकावत असल्याचंही दिसतं. हे वाचा -  बापरे बाप! किचनमध्ये लपून बसला होता खतरनाक कोब्रा साप, हात लागला आणि…; अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL स्कूटीत साप असल्याचं समजताच सर्पमित्राला बोलावण्यात आलं. त्याने सापाला स्कूटीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सर्पमित्राने तो भाग पूर्णपणे खोलला आणि सापाची शेपटी धरली. त्यानंतर हळूहळू सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तितक्या साप स्वतःच त्यातून अचानक बाहेर आला. फणा काढून तो उभा राहिला. बाहेर येताच तो सर्पमित्राला चावल्याचंही दिसतं.

युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वांना धडकी भरली आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या