JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: जबरदस्ती तरुणाच्या गळ्यात साप टाकून पैसे मागू लागला गारूडी; पुढे जे घडलं ते धक्कादायक

VIDEO: जबरदस्ती तरुणाच्या गळ्यात साप टाकून पैसे मागू लागला गारूडी; पुढे जे घडलं ते धक्कादायक

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्याच्या कडेला असलेला एक गारुडी जबरदस्ती एका मुलाच्या गळ्यात साप टाकतो. यानंतर तो या मुलाकडे पैसे मागू लागतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 02 मे : सध्या गारुडी आणि एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये गारुडी मुलाच्या गळ्यात साप टाकून त्याच्याकडे पैसे मागताना दिसत आहे. गारुडीच्या या कृत्यानंतर मुलगा इतका घाबरला की तो सापाला आपल्या गळ्यातून काढून खाली फेकतो आणि सरळ पळून जातो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Snake Charmer Shocking Video) झाला आहे. ज्यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी गारुड्याने मुलासोबत केलेल्या कृत्याला घाणेरडी चेष्टा असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी सापाच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. झाडाला उलटं लटकवून तरुणाला काठीने जबर मारहाण; घटनेचा संतापजनक VIDEO कारण भीतीने या मुलाने गळ्यातून काढून सापाला जोरात खाली फेकलं.लोकांचं असं म्हणणं आहे, की गारुडी या सापाचा छळ करत आहे. त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. हा व्हिडिओ अवघ्या १४ सेकंदाचा आहे. मात्र व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल आणि तुम्हालाही या गारुड्याच्या कृत्याचा राग येईल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्याच्या कडेला असलेला एक गारुडी जबरदस्ती एका मुलाच्या गळ्यात साप टाकतो. यानंतर तो या मुलाकडे पैसे मागू लागतो. यादरम्यान हा मुलगा गारुडीला वारंवार म्हणत राहातो, की थांब पैसे मिळतील. मात्र, तो काहीही ऐकत नाही. यानंतर या तरुणाची जी अवस्था होते, ती पाहण्यासारखी असते. हा तरुण इतका घाबरतो की तो सापाला जमिनीवर टाकून तिथून पळ काढतो. या व्हिडिओ इथेच संपतो. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. इथे पाहा व्हिडिओ VIDEO: अचानक नदीचं पाणी वाढलं आणि पुरात अडकला कार चालक; पुढे जे घडलं ते हादरवून सोडणारं हा व्हिडिओ पाहून तुम्हीही गारुड्याच्या या कृत्यामुळे संताप व्यक्त कराल. हा व्यक्ती ज्यापद्धतीने तरुणाच्या गळ्यात साप टाकतो आणि हा मुलगा घाबरतो, ते पाहून असं जाणवतं की इथे काहीतरी दुर्घटनाही घडू शकत होती. पैसे मागण्याची ही पद्धत अतिशय चुकीची आहे. कारण यामुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. फेसबुकवर विजय नावाच्या यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत ६० लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. शेकडो लोकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, की अशी मस्करी कोणाचसोबत नाही केली पाहिजे. दुसऱ्या एकाने लिहिलं, मला सापाची अवस्था पाहून त्याची दया येतीये. आणखी एकाने लिहिलं, की गारूडी सापांचा खूप छळ करतात. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या