JOIN US
मराठी बातम्या / Viral / फणा VS पंजा; मांजर आणि सापातील जबरदस्त फायटिंगचा थरार; पाहा VIDEO

फणा VS पंजा; मांजर आणि सापातील जबरदस्त फायटिंगचा थरार; पाहा VIDEO

साप आणि मांजर (Snake and cat) जेव्हा आमनेसामने येतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 ऑगस्ट : साप (Snake) आणि मुंगूस आपसात भिडल्याचे तुम्ही बरेच व्हिडीओ (Snake video) पाहिले असतील. पण आता सोशल मीडियावर (Social media) साप आणि मांजराच्या (Snake and cat) जबरदस्त फायटिंगचा (Snake and cat fighting) व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. फणा काढून समोर उभ्या असलेल्या सापाला मांजराने (Snake and cat video) आपल्या पंजाने चांगलीच टक्कर दिली आहे. मांजर आणि साप समोरासमोर आले तर कोण जिंकेल, असं विचारलं तर साहजिकच आपण साप म्हणू. पण इथं मात्र मांजराने बाजी मारली आहे. शिकार करायला आलेल्या सापाला मांजराने सरो की पळो करून सोडलं. शिकारीसाठी आलेला साप तसाच परत गेला.

संबंधित बातम्या

सापाला पाहून सर्वांनाच घाम फुटतो. पण मांजराने मात्र त्याला सॉलिट टक्कर दिली आहे. व्हिडीओत पाहू शकता एका बॉक्समध्ये मांजर बसलेलं आहे. समोरून एक साप आला. मांजरावर हल्ला करण्याच्या हेतूनेच तो आला. पण मांजर काही घाबरलं नाही. सापाला पाहताच ते उठून उभं राहिलं. साप मांजरासमोर फणा काढून उभा राहिला. मांजरही आपल्या रक्षणासाठी सज्ज झाली. हे वाचा -  VIDEO - थेट म्हशीलाच उचलायला गेला पण…; स्वतःला बाहुबली समजणाऱ्या तरुणाची फजिती सापाने मांजराला दंश करण्याचा प्रयत्न करतात मांजराने आपल्या पंजाने सापाच्या तोंडावर मारलं. साप जसा दंश करण्याचा प्रयत्न करत होता तसं मांजर आपल्या पंजाने त्याच्यावर वार करत राहिलं. सापाच्या फणाला तिने आपल्या पंजाने उत्तर दिलं. अखेर इथं काही आपलं खरं नाही हे सापाला समजून चुकलं. त्यामुळे साप जसा आला तसंच तो मागे परतला. हे वाचा -  VIDEO : इवल्याशा पक्षानं घडवली सापाला अद्दल; मरणाच्या दारातून केली स्वतःची सुटका आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. मांजराच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या