JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : साप आणि सरड्याची झुंज, पाहा शेवटी कोण जिंकलं?

Viral Video : साप आणि सरड्याची झुंज, पाहा शेवटी कोण जिंकलं?

जगभरात अनेक धोकादायक प्राणी आहेत. ते दुसऱ्या प्राण्यांची शिकार करुन आपली भूक भागवतात. यातील एक विषायी आणि भयानक प्राणी म्हणजे साप. सापाचं नाव घेतलं तरी अनेक लोक घाबरतात.

जाहिरात

साप आणि सरड्यची झुंज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 जून : जगभरात अनेक धोकादायक प्राणी आहेत. ते दुसऱ्या प्राण्यांची शिकार करुन आपली भूक भागवतात. यातील एक विषायी आणि भयानक प्राणी म्हणजे साप. सापाचं नाव घेतलं तरी अनेक लोक घाबरतात. त्यांच्या हल्ल्याविषयी तर बोलायलाच नको. सापांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये साप आणि सरड्याची लढाई सुरु आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका सापाने भिंतीवर सरडा पकडला आहे. यानंतर तो हळूहळू त्याला मारण्याचा प्रयत्न करतोय. सापाने पूर्णपणे सरड्याला वेटोळे घातले आहेत. तेवढ्यात सरड्याचा दुसरा साथीदार येतो आणि त्याला संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जण मित्राला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपल्या जीवाचीही बाजू लावतो याचं हे उत्तम उदाहरण आहे.

सरड्याचा साथीदार त्याला सापाच्या तावडीतून सोडण्याचा खूप प्रयत्न करतो. ही झुंज पाहण्यासारखी आहे. शेवटी तो आपल्या मित्राला वाचवताना स्वतःच खाली पडतो. त्याच्यासोबत सापही खाली पडताना दिसतो. ही झुंज पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सोबत तुम्ही म्हणाल मैत्री असावी तर अशी.

संबंधित बातम्या

@ivan_starykh नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. अनेक कमेटंगी व्हिडीओवर येताना दिसतायेत. दरम्यान, सरडा आणि सापाची थरारक झुंज व्हायरल होतेय. यापूर्वीही अनेक प्राण्यांचे हल्ल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. एकापेक्षा एक थरारक आणि भयानक हल्ले समोर येत असतात. असे व्हिडीओ काही वेळात धुमाकूळ घालतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या