नवी दिल्ली 31 जानेवारी : घरात लहान मुलं असली की वातावरण प्रसन्न राहातं. मुलांशिवाय घर अगदी शांत वाटतं. मात्र ज्या घरांमध्ये लहान मुलं असतात त्या घरातील लोकांच्या जबाबदाऱ्या खूप वाढतात. कारण लहान मुलं मस्ती करणारी आणि तितकीच चपळही असतात. ही मुलं एका जागेवर शांत बसत नाहीत. अशात त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं तर ती या वेळेत काहीही करू शकतात. सध्या सोशल मीडियावर एक लहान मुलीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ प्रत्येक पालकांना मोठा धडा देणारा आहे. व्हिडिओमध्ये एक चिमुकली घरातून बाहेर येऊन स्विमिंग पुलमध्ये कोसळल्याचं दिसतं (Small Girl Fall in Swimming Pool). यानंतर जे काही घडतं, ते हैराण करणारं आहे. हुश्शार चिमुकली! अवघ्या दीड वर्षाच्या वयात बनवते स्वयंपाक; काम पाहून सगळेच अवाक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक लहान मुलगी घरातून बाहेर येत स्विमिंग पुलजवळ जाते. मात्र पुढच्याच क्षणी जे काही घडतं, ते पाहून कोणीही घाबरेल. स्विमिंग पुलजवळ जाताच चिमुकली पाण्यात उतरते आणि यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागते. मुलगी पाण्यात पडल्याचा आवाज येताच तिचे वडील धावत येत पाण्यात उडी घेतात आणि तिला वाचवतात. सुदैवाने ही चिमुकली सुखरूप बाहेर आली. मात्र, हे दृश्य खरंच घाबरवणारं आहे.
चिमुकलीचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर _.nnn.zziii नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. यूजरने व्हि़डिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, नशीब देव सगळं बघतो. इन्स्टाग्रामवर काही तासापूर्वी अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 32 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. हा आकडा वाढतच आहे. व्हिडिओ पाहून लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक मुलीच्या आई-वडिलांवर भडकले आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, हे बेजबाबदार पालक आहेत. देवाच्या क्रुपेने या चिमुकलीसोबत काही वाईट घडलं नाही. दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत म्हटलं, मला तर हे पाहून विशेष वाटलं की चिमुकली स्विमिंग पुलमध्ये पडताच पोहायला लागली. हे सोडा, पण तिचे आई-वडील बेजबाबदार आहेत, हे खरं. आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, की जर मुलं स्विमिंग पुलच्या आसपास असतील तर पालकांनी लक्ष ठेवायला हवं.