नवी दिल्ली 23 ऑक्टोबर : मेहुण्यांची मस्ती आणि दाजीच्या मस्करीशिवाय लग्नसमारंभाची (Wedding) मजा येत नाही. मेहुणी अन् दाजीच्या मजा मस्करीमुळेच लग्नाला खऱ्या अर्थाने रूप येतं. यात बूट चोरी करण्याचा खेळ तर सर्वांच्याच पसंतीचा आणि खास असतो. यात मेहुण्या आपल्या दाजीचा बूट चोरतात आणि नंतर त्याच्याकडून मोठी रक्कम घेऊनच तो परत देतात. छतावरुन उतरण्यासाठी दीड वर्षाच्या मुलानं केलं असं काही..; VIDEO पाहून व्हाल शॉक बूट चोरीच्या या खेळासाठी आपल्या दाजीच्या आजूबाजूला असलेल्या अशाच मेहुण्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Wedding Video Viral on Social Media) होत आहे. यात आपल्या दाजीकडून पैसे घेण्यासाठी मेहुण्यांनी जे काही केलं ते पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. या लग्नात नवरदेवाचे बूट चोरण्यासाठी मेहुण्यांनी भरपूर तयारी केली. त्यांनी आधी स्टेजवर आरामात बसलेल्या नवरदेव नवरीला घेरलं आणि नंतर आपल्या टीम मेंबर्सला नवरदेवाला असं पकडायला सांगितलं, की तो बिचारा जागेवरुन हालूही शकला नाही.
मेहुण्यांनी यानंतर दाजीचे बूट काढून घेतले आणि मग त्या स्टेजवरुन खाली गेल्या. मेहुण्या स्टेजवरुन गेल्यानंतर नवरीच्या भावांनी दाजीला सोडलं. मात्र, तोपर्यंत त्याचे बूट मेहुण्या घेऊन गेलेल्या असतात. मेहुण्या यानंतर बूटाच्या बदल्यात आपल्या दाजीकडे मोठी मागणीही करतात. बांधकाम मजुरानं दाखवला आपल्या जबरदस्त डान्सचा जलवा; VIDEO पाहून घालाल तोंडात बोट मेहुण्यांची मागणी ऐकून लोक हसू लागतात. तर नवरदेव फक्त हसत राहतो. यादरम्यान नवरीही हे सगळं पाहून हसत राहते. अखेर नवरदेव आपल्या मेहुण्यांची अट मान्य करत त्यांना बोलवताना दिसतो. दाजी आणि मेहुण्यांचा हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शादी वादी नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.