JOIN US
मराठी बातम्या / Viral / सिंधुदुर्गच्या रस्त्यावर आली मगर, कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नागरिक थांबताच...; थरकाप उडवणारा VIDEO

सिंधुदुर्गच्या रस्त्यावर आली मगर, कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नागरिक थांबताच...; थरकाप उडवणारा VIDEO

सिंधुदुर्गच्या रस्त्यावर मगर दिसल्याने नागरिक दहशतीत आहेत.

जाहिरात

सिंधुदुर्गमध्ये रस्त्यावर मगर.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सिंधुदुर्ग, 18 ऑक्टोबर : मगरी चे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात मगरी जंगलात, पाण्यात शिकार करताना दिसतात. पण सध्या असा व्हिडीओ समोर आला ज्यात मगर चक्क रस्त्यावर दिसते आहे. धक्कादायक म्हणजे हे दृश्य सिंधुदुर्गमधील आहे. हो सिंधुदुर्गच्या रस्त्यावर मगर दिसली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी-आरोंदा रस्त्यावर रात्री ही मगर दिसली. एका गाडीसमोर ही मगर आली. मगरीला पाहताच गाडीचालकाने गाडी थांबवली. मगरीला कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह त्यांना आवरला नाही. गाडी थांबवून त्यांनी मगरीला कॅमेऱ्यात कैद करायला सुरुवात केली. रस्त्याच्या कडेला ही मगर होती. हे वाचा -  कसं शक्य आहे? मगरीच्या जबड्यात जाऊनही तो जसाच्या तसा जिवंत बाहेर आला; Shocking Video काही वेळात मगरीने शिकार केली. तिच्या जबड्यात एक साप दिसतो. सापाला तोंडात धरून मगर रस्त्याच्या एका बाजूने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाते आणि ती झाडांमध्ये गायब होते.  जवळपास पाच ते सहा फुटांची ही मगर.

ही मगर तेरेखोल नदीतून रस्त्यावर आली होती. बराच वेळ ती रस्त्यावर ठाण मांडून बसली होती.  आता तेरेखोल नदीतील मगर रस्त्यावर दिसू लागल्याने नागरिक दहशतीत आहे. वाहनचालकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.

मगरी अशा प्रकारे रस्त्यावर, शेतात फिरू लागल्याने वनविभागाने याचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी होते आहे. मगरीबाबत तुम्हाला हे माहिती आहे का? आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया खंडांत मगरी आढळून येतात. भारतात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व पंजाब ही राज्ये वगळता इतर राज्यांत मगरी आढळतात. भारतात क्रोकोडिलस या प्रजातीत क्रोकोडिलस पॅल्युस्ट्रिस आणि क्रोकोडिलस पोरोसस अशा दोन जाती आहेत. तर गॅव्हिॲलिस प्रजातीत गॅव्हिॲलिस गँजेटिकस ही एकच जाती आहे. क्रोकोडिलस पॅल्युस्ट्रिस आणि गॅव्हिॲलिस गँजेटिकस या जाती गोड्या पाण्यात आढळतात, तर क्रोकोडिलस पोरोसस ही जाती मचूळ पाण्यात आढळते. हे वाचा -  विषारी King Cobra ला तलावाबाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरला तरुण; काय झाला शेवट पाहा VIDEO गोड्या पाण्यातील मगर सुमारे 4.5 मी. लांब, तर मचूळ पाण्यातील सुमारे 6 मी.पेक्षा अधिक लांब असते. पूर्ण वाढ झालेल्या मगरीचे वजन 200-250 किग्रॅ. असते. पाण्यात वावरण्यासाठी मगरीचे शरीर अनुकूलित झालेले असते. मगर मांसाहारी असून मासे हे तिचे मुख्य अन्न आहे. पक्षी आणि जमिनीवरील प्राणी हेही ती खाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या