व्हायरल व्हिडीओ
मुंबई 19 जानेवारी : सध्या भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट टीम दरम्यान वन-डे सीरिज सुरू आहे. या सीरिजमधील पहिली मॅच भारताने जिंकली आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिलनं तुफानी खेळी करत आपल्या वन-डे कारकिर्दीतील पहिलं द्विशतक झळकवलं. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाने न्यूझीलंडचा 12 रन्सनी पराभव केला. त्यामुळे तीन मॅचेसच्या सीरिजमध्ये भारताला 1-0 अशी आघाडी मिळाली आहे. या मॅच दरम्यानचा शुभमन गिलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये शुभमन फिल्डिंग करताना बॉन्ड्रीलाईनजवळ येतो. यावेळी तो लोकांच्या फारच जवळ असतो, तो तेथे येताच स्टेडियममधील त्याचे फॅन सारा-सारा म्हणून ओरडू लागतात. ज्यावर शुभमन फारसं काही रिएक्टच करत नाही. हे ही पाहा : ‘‘सारा आणि शुभमन गिलचा ठरला साखरपुडा’’, क्रिकेटरचा खेळ पाहून सचिनकडून घोषणा? पण हा व्हिडिओ बघून आता सोशल मीडियावरील चाहते संभ्रमात पडले आहेत की, ही नेमकी कोणती सारा आहे? कारण, शुभमन गिलचं नाव दोन साराशी जोडलं गेलं आहे. त्यापैकी एक सारा ही सारा तेंडूलकर आहे. तर दुसरी सारा ही अभिनेत्री सारा अली खान आहे. या दोघींसोबत क्रिकेटर शुभमनचं नाव जोडलं गेलं. त्यामुळे आता कोणती सारा मानायची हेच लोकांना कळत नाहीय. या पूर्वी सारा अली खान आणि शुभमनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघांचा विमानावरील एक व्हिडिओ ही समोर आला होता. त्यावेळी हे दोघं एकत्र प्रवास करताना दिसले होते.
रोमांचक मॅचमध्ये भारताचा विजय न्यूझीलंड विरुद्धचा पहिली वन-डे मॅच अतिशय रोमांचक ठरली. टीम इंडियाने टॉस जिंकून अगोदर बॅटिंग करून आठ विकेट्सच्या बदल्यात 349 रन्स केले. त्यामध्ये शुभमन गिलनं 208 रन्सची खेळी केली. त्याच्या द्विशतकाशिवाय एकाही भारतीय खेळाडूला 50 रन्सपर्यंत मजल मारता आली नाही. रोहित शर्मानं 34 आणि सूर्यकुमार यादवनं 31 रन्स केले. न्यूझीलंडच्या बाजूनं डेरेल मिशेल आणि हेन्री शिपली यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. 350 रन्सच्या टारगेटचा पाठलाग करताना न्यूझीलंडची टीम 49.2 ओव्हर्समध्ये 337 रन्समध्ये ऑलआउट झाली. मायकेल ब्रेसवेलनं 140 रन्स केले. पण, त्याला आपल्या टीमला विजय मिळवून देता आला नाही.