JOIN US
मराठी बातम्या / Viral / धक्कादायक VIDEO! इमारतीच्या 32व्या मजल्यावर खेळत होती लहान मुलं, एक खाली घसरला आणि...

धक्कादायक VIDEO! इमारतीच्या 32व्या मजल्यावर खेळत होती लहान मुलं, एक खाली घसरला आणि...

पालकांचं लक्ष आहे की नाही? 32 मजल्याच्या इमारतीवर खेळत होती लहान मुलं, थरकाप उडवणारा व्हिडीओ एकदा पाहाच.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 15 जून : एकीकडे जगभरात कोरोना पसरवल्याचा आरोप चीनवर केला जात आहे. दुसरीकडे चीनमध्ये रुग्णांचा आकडा कमी होत आहे, त्यामुळं लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. परिणामी लोकं घराबाहेर पडत आहे, मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे. चीनमधील गुईझोऊ प्रांताच्या झुनी येथील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये 4 मुलं एका 32 मजली इमारतीच्या छतावर खेळताना दिसत आहेत. एससीएमपीनं दिलेल्या बातमीनुसार, ही मुलं 10 वर्षांच्या खालची होती. तब्बल 20 मिनिटं ही मुलं छतावर खेळत होती. या छताला संरक्षण कडाही नव्हता. यातच एक मुलगा काहीसा घसरल्याचाही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुलांच्या पालकांवर टीका केली जात आहे. वाचा- VIDEO : शेतकऱ्यानं वानराच्या पिल्लाला दिलं जीवदान, जाळ्यातून अशी केली सुटका व्हायरल होत असलेले हा व्हिडीओ SCMP या वृत्तवाहिनीनं प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओला मुलांसाठी खेळायचा बरीच जागा असूनही ते 32 मजली इमारतीच्या छतावर खेळत आहेत, असे कॅप्शन देण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे या इमारतीच्या छतावर दोन विजेचे खांबही आहेत. वाचा- पार्कात आलं भूत आणि करू लागलं जिम? फिटनेस फ्रिक भुताचा VIDEO VIRAL

संबंधित बातम्या

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलं आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडून गच्चीवर गेली. जेव्हा मुलं छतावर गेली तेव्हा एका शेजाऱ्यानं हा प्रकार कॅमेऱ्यात टिपला, नंतर त्यांनं मुलांना खाली आणलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पालकांना फटकारलं. वाचा- बिबट्याला थंडी लागली, तर व्यक्तीने लहान बाळासारखं घेतलं चादरीत VIDEO VIRAL

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या