चेंबूरमध्ये रस्ता खचला
मुंबई, 5 जुलै : मुंबईतील चेंबूरमधून खळबळजनक घटना समोर आलीय. एसआरए इमारतीसमोरील रस्ता खचला आहे. रहदारीचा रस्ता खचल्यानं नागरिकांची चांगली तारांबळ उडाली आहे. एवढंच नाही तर या खचलेल्या रस्त्यावर 40-50 गाड्या खड्ड्यात गेल्याचंही समोर येत आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरस होत आहे. वसंत दादा पाटील इंजिनियर समोरील राहूल नगर येथील एसआरए इमारतीसमोर रस्ता खचल्याचा हा प्रकार घडला आहे. चुनाभट्टीमध्ये जमीन खचली असून या खड्ड्यात 40-50 गाड्या कोसळल्या आहेत. ज्यामुळे लोकांना तेथून येण्याजाण्यास अडचण निर्माण होतेय. Chembur Road Collapse : चेंबुरमध्ये रहदारीचा रस्ता खचला; 40-50 वाहनं गेली खड्ड्यात, धक्कादायक Photos आजुबाजूच्या बिल्डिंगमधील लोकांना बाहेर काढून बिल्डिंग खाली करण्यात आल्या आहेत. घटनास्थळीत मुंबई अग्निशामक दल पोलिस कर्मचारीवर्ग उपस्थित आहेत. लोकांना याठिकाणावरुन प्रवास करताना त्रास होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक चार चाकी या खचलेल्या रस्त्यात घसरत जाताना दिसतेय. ती या खड्डात कोसळते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. मुंबईत तर पावसामुळे ट्रॅफिक जाम होत असून लोकांना बाहेर पडण्यास अडचण होतेय. यातच चेंबुरमध्ये रस्ता खचला. त्यामुळे लोकांचा संताप होत आहे.