JOIN US
मराठी बातम्या / Viral / धक्कादायक Video, झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला नको त्या ठिकाणी चावला कुत्रा; तरुण रुग्णालयात

धक्कादायक Video, झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला नको त्या ठिकाणी चावला कुत्रा; तरुण रुग्णालयात

डिलिव्हरी बॉय लिफ्टच्या बाहेर पडला अन् अचानक कुत्रा त्याच्या जवळ आहे आणि…

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पनवेल, 29 ऑगस्ट : पनवेल तालुक्यातील कोन इंडियाबुल्स येथे झोमॅटोकडून पदार्थाची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या तरुणाचा कुत्र्याने चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आला आहे. लिफ्ट मधून बाहेर पडताना कुत्र्याने त्याच्या चावा घेतल्याचे दिसत आहे. कुत्रा चावा घेतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय 11 एफ या इमारतीमध्ये पदार्थाची डिलिव्हरी करण्यासाठी आला होता. यावेळी लिफ्टमधून बाहेर पडताना त्याच इमारतीतील व्यक्ती कुत्र्याला घेऊन लिफ्टमध्ये चढत असताना कुत्र्याने डिलिव्हरी बॉयच्या चावा घेतला. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर या तरुणावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या

जुलै महिन्यात लखनऊच्या बंगाली टोला येथील रहिवासी असलेल्या सुशीला त्रिपाठी यांच्यावर मंगळवारी सकाळी त्यांच्याच पिटबुल ‘ब्राउनी’ने हल्ला केला. निवृत्त शिक्षिका असलेल्या सुशीला त्रिपाठी नेहमीप्रमाणे त्यांच्या पिटबुल ‘ब्राउनी’ आणि लॅब्राडॉरसोबत फिरायला गेल्या होत्या. दरम्यान, सुशीला त्रिपाठी यांच्यावर पिटबुलने अचानक हल्ला केला. Pitbull attack: पाळीव कुत्र्याचा 80 वर्षाच्या मालकिणीवर जीवघेणा हल्ला! एक तास तोडत होता लचके पिटबुलने पूर्ण ताकदीने सुशीला त्रिपाठी यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या शरीराच्या अनेक ठिकाणी लचके तोडले. हल्ल्यानंतर पिटबुल महिलेचे मांस खात असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. एका शेजाऱ्याने सांगितले की, ‘किंकाळी ऐकून तो बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की पिटबुलने सुशीला त्रिपाठी यांच्यावर हल्ला केला होता आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या