व्हायरल
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : साप हा खूप धोकादायक आणि भीतीदायक प्राणी आहे. कधी कुठे साप निघेल याचा काही नेम नाही. सापाचे अनेक धक्कादायक, अंगावर काटा आणणारे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. तुम्ही घरासमोरील बागेत बसला आहात आणि अचानक साप तुमच्या अंगावर चढला तर तुम्ही काय कराल? अशा प्रसंगी तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. असाच काहीसा प्रकार प्रत्यक्षात घडल्याचं समोर आलंय. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील महिलेसोबच असा धक्कादायक प्रकार घडला असून तिच्या अंगावर चक्क साप चढल्याचं दृश्य पहायला मिळालं. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला घराच्या बागेत बिकिनीमध्ये सनबाथ एन्जॉय करताना दिसत आहे. पण पुढच्याच क्षणी महिलेच्या हृदयाचे ठोके वाढतात. रेंगाळताना एका महिलेच्या पायावर साप चढल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही बाब महिलेच्या लक्षात येताच ती घाबरून उडी घेते आणि खुर्चीवरुन बाजूला जाते.
व्हिडीओमध्ये महिलेची अक्षरशः घाबरगुंडी उडाल्याचं दिसून आलं. हा व्हिडिओ @WowTerrifying या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांची ही क्लिप सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवत आहे. व्हिडिओला आतापर्यंत 18 लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे, तर 25 हजारांहून अधिक लाईक्स आणि 2300 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत.
दरम्यान, या व्हिडीओवर शेकडो लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना तर काही वेळासाठी धक्काच बसला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चांगलाच चर्चेत आला आहे. यामुळे सापाची भीती अजूनच मनात बसत आहे. कारण आपण कुठेही बाहेर असून तिथे साप निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.