लखनऊ, 18 मार्च : देशभरात बहुतेक ठिकाणी आज धूलिवंदन उत्साहात साजरं झालं. त्याआधी काल गुरुवारी होळी साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी होलिका दहन करण्यात आलं. प्रत्येक ठिकाणी होळीच्या वेगवेगल्या प्रथा-परंपरा आहेत. अशाच एका होळीचा शॉकिंग व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका व्यक्तीने पेटत्या होळीत उडी मारली. त्यानंतर पुढे जे घडलं ते शॉकिंग आहे (Man jumped in holika dahan). उत्तर प्रदेशच्या (Uttar pradesh) मथुरातील (Mathura holi) फालेन गावातील होलिका दहनाचा हा व्हिडीओ आहे. होळी धगधगत होती. होळी इतकी मोठी आहे, ही ती पाहूनच आपल्याला धडकी भरते. पण याच पेटत्या, धगधगत्या होळीत अचानक एका व्यक्तीने उडी मारली. व्हिडीओत पाहू शकता होळीच्या आजूबाजूला बरेच लोक उभे आहेत. त्यापैकी एक व्यक्ती पुढे येते आणि होळीच्या दिशेने पळते. ती फक्त होळीजवळच येत नाही तर थेट होळीत प्रवेश करते. त्यातही शॉकिंग म्हणजे ही व्यक्ती एका बाजूने होळीत उडी मारते आणि दुसऱ्या बाजूने सुखरूप बाहेर येते. हे वाचा - पिल्लांना वाचवण्यासाठी खतरनाक कोल्ह्याशी भिडला छोटासा पक्षी; VIDEOचा शेवट शॉकिंग इतक्या आगीत जाऊनही या व्यक्तीला काहीच होत नाही. अगदी सहजपणे ती या होळीतून बाहेर पडते. दुसऱ्या बाजूला असलेले लोक एक त्याला उचलतात आणि कापडात गुंडाळून घेऊन जातात.
या व्यक्तीचं नाव मोनू पंडा असल्याचं सांगितलं जातं आहे. गेल्या महिनाभरापासून तो प्रल्हाद मंदिरात तप करत होता. होळीदिवशी त्याने प्रल्हाद कुंडात स्नान केलं आणि भक्त प्रल्हादाची पूजा करून होलिकाच्या आगीत उडी मारली. यातून तो सुखरूप बाहेर आल्यानंतर सर्वांनी भक्त प्रल्हादाचा एकच जयघोष केला. हे वाचा - OMG! भलतीच हिंमत करून व्यक्तीने थेट मगरीला मारली मिठी अन्..; धडकी भरवणारा VIDEO आपल्याला माहिती आहे होलिका भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन आगीत बसली होती. तिला आगीत न जळण्याचं वरदान होतं. पण भक्त प्रल्हादाच्या विष्णू भक्तीपुढे तिचं हे वरदानही फेल झालं. होलिका जळून भस्म झाली आणि भक्त प्रल्हाद मात्र बचावला. या कथेशी संबंधित प्रथा इथं अवलंबली जात असल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे.