JOIN US
मराठी बातम्या / Viral / विंचू आणि विषारी सापांपासून बनवली जाते ही विचित्र डिश; रेसिपी पाहूनच उडेल थरकाप, VIDEO

विंचू आणि विषारी सापांपासून बनवली जाते ही विचित्र डिश; रेसिपी पाहूनच उडेल थरकाप, VIDEO

Scorpion Snake Soup : हे सूप विषारी साप आणि विंचू यांच्यापासून बनतं आणि यात डुकराचं मांसही टाकलं जातं. यानंतर यात काही मसाले टाकले जातात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 20 फेब्रुवारी : जगभरात अनेक अशा विचित्र डिश बनवल्या जातात, ज्याबद्दल जाणूनच लोक हैराण होतात. यातील काही डिश वेगवेगळ्या प्राण्यांचा वापर करून बनवल्या जातात तर काही इतर पद्धतीने. चीन अशा अजब डिशेससाठी प्रसिद्ध आहे. तिथे अनेक प्रकराच्या प्राण्यांचं मांस आणि त्यापासून बनणाऱ्या डिश खाल्ल्या जातात (Weird Dishes). सध्या सोशल मीडियावर अशीच एक नवीन प्रकारची डिश चर्चेत आहे. ही डिश विंचू आणि साप यांच्यापासून बनवली जाते (Scorpion Snake Soup Video). काहीही! अडल्ट मॉडेलच्या दातात अडकला जीव; फॅन्सने जे केलं ते वाचूनच धक्का बसेल चीनच्या गुआंदडॉन्ग येथे एक अतिशय भीतीदायक अशी डिश बनवली जाते. या डिशमध्ये दोन सगळ्यात विषारी जीव टाकले जातात. यातील एक असतो विंचू आणि दुसरा साप. उत्तर चीनमध्ये फ्राय केलेले विंचू अगदी आवडीने खाल्ले जातात. ते रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्येही अगदी सहज मिळतात. मात्र उत्तरेकडील भागात याचा यापेक्षा जास्त वापर होत नाही. परंतु दक्षिण भागाबद्दल बोलायचं झालं तर इथे विंचू आणि सापाचं खास सूप बनवलं जातं (Scorpion and Snake Soup)

हे सूप विषारी साप आणि विंचू यांच्यापासून बनतं आणि यात डुकराचं मांसही टाकलं जातं. यानंतर यात काही मसाले टाकले जातात. चीनमधील लोकांचं असं म्हणणं आहे की हे खास सूप शरीराल डिटॉक्स करण्याचं काम करतं. स्कॉर्पियन सूप हे गुआंगडॉन्गची खास डिश आणि कल्चरचा एक भाग असलं तरी याठिकाणी प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला ते मिळणार नाही. याचं कारण म्हणजे ही डिश अतिशय अनुभवी कुकच बनवतात. ज्यांना माहिती असतं की डिश बनवण्याआधी विंचूच्या आतील विष बाहेर कसं काढायचं आहे. त्यामुळे कुकला विंचाला हँडल करण्याचं टॅलेन्टही असायला हवं.

टेन्शनमुळे जगातील सर्वात मोठ्या मगरीचा मृत्यू? शाळकरी मुलाची केलेली शिकार

विष काढल्यानंतर साप आणि विंचू यांना तब्बल तीन तास स्ट्यू केलं जातं. यासोबत पोर्क, साप, लसूण, आलं, मसाले आणि काही भाज्याही टाकल्या जातात. अनेक लोकांनी सांगितलं की दिसायला ही डिश अतिशय़ घाणेरडी दिसते आणि खाण्याची इच्छा होत नाही, मात्र त्याची चव अतिशय खास असते. एका रिपोर्टनुसार, विंचाचा रसच पिण्यासाठी पुरेसा असतो मात्र काही लोक विंचू खाण्याचाही प्रयत्न करतात. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, हे विंचाचं सूप उच्च रक्तदाबासह त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यात मदत करतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या