JOIN US
मराठी बातम्या / Viral / वैज्ञानिकांना सापडला 'प्रेग्नंट हिरा'; तोडताच आतमधील वस्तू पाहून झाले अवाक

वैज्ञानिकांना सापडला 'प्रेग्नंट हिरा'; तोडताच आतमधील वस्तू पाहून झाले अवाक

हिऱ्याच्या आतून बाहेर पडलेल्या या खनिजाला डेव्हिमाओइट (Davemaoite) असे नाव देण्यात आले आहे. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ Ho-Kwang माओ यांच्या नावावरून खनिजाला हे नाव मिळाले

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 15 नोव्हेंबर : जगातील बहुतेक खनिजे खडकाखाली सापडतात. ते मोठ्या दगडांच्या आकारात आढळतात, जे नंतर परिष्कृत केले जातात. सोनेही याच पद्धतीने काढले जाते. परंतु अलीकडेच शास्त्रज्ञांना असे खनिज सापडले आहे जे यापूर्वी कधीही पाहिले नव्हते (New Mineral Found). सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे हे खनिज इतर कोठेही सापडत नाही, तर हिऱ्याच्या आतून निघते. हा हिरा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खूप खोलातून काढण्यात आला. अनेकजण या खनिजाला गर्भवती हिऱ्याचे उत्पादन असल्याचे सांगत आहेत. फोटो काढतानाच शेजारी फुटला फटाका अन्..; पाहा कशी झाली तरुणीची अवस्था, VIDEO हिऱ्याच्या आतून बाहेर पडलेल्या या खनिजाला डेव्हिमाओइट (Davemaoite) असे नाव देण्यात आले आहे. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ Ho-Kwang माओ यांच्या नावावरून खनिजाला हे नाव मिळाले. हे पृथ्वीच्या आत असलेल्या उच्च दाबाच्या कॅल्शियम सिलिकेट पेरोव्स्काईटचे (CaSiO3) उत्तम उदाहरण आहे. या दगडाचे एकच रूप सामान्य आहे. तो सर्वत्र आढळतो, ज्याला आपण हिरा म्हणून ओळखतो. पण आता सापडलेले अनोखे खनिज यापूर्वी कधीच सापडले नव्हते.

शास्त्रज्ञांच्या मते, डेव्होमाइट मोठ्या प्रमाणात असते. हे खनिज पृथ्वीच्या मध्यभागी आहे. ते तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या दबावाचे प्रमाण खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत जिथे हे खनिज सापडते तिथे उत्खनन खूप कमी होऊ शकते. याबद्दल फक्त पुस्तकांमध्ये वाचलं होतं परंतु अलीकडेच बोट्सवानामध्ये सापडलेल्या डेव्होमाइटच्या आतून एक हिरा बाहेर आला ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. LiveScience च्या बातमीनुसार, ज्या हिरामधून Davomite सापडला तो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 660 किमी खाली होता. दूध देत नाही म्हणून म्हशीलाच पोलीस ठाण्यात घेऊन आला शेतकरी; अधिकारीही हैराण इंटरनॅशनल मिनरोलॉजिकल असोसिएशनने हे नवीन खनिज असल्याची पुष्टी केली आहे. लॉस वेगासमधील नेवाडा विद्यापीठातील खनिजशास्त्रज्ञ Oliver Tschauner यांनी सांगितले की, या दगडाचा शोध एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही. त्यांनी सांगितलं की सापडलेला डेव्होमाइट फक्त काही मायक्रोमीटर मोठा होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या