किंग कोब्राचा मालकावर हल्ला
नवी दिल्ली, 01 जून : साप हा भयानक प्राण्यांपैकी एक आहे. ज्याचं नाव घेतलं तरी अंगावर काटा उभा राहतो. यातच नाग किंवा किंग कोब्राविषयी तर बोलायलाच नको. त्यांच्या हल्ल्याचे अनेक भयावह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच आणखी एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये किंग कोब्राने आपल्या मालकावरच हल्ला केल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. जगभरात असे काही लोक आहेत जे सापांना अजिबात घाबरत नाहीत आणि ते त्यांना पाळीव प्राणी देखील बनवतात. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका व्यक्तीने शेकडो कोब्रा सापांना जेलबंद केलं आहे. तो त्यांना रोज चविष्ट अन्नही देतो. जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा त्या व्यक्तीने अन्न देण्यास उशीर केल्यावर किंग कोब्रा रागाने लाल झाला आणि नंतर त्याने मालकावर हल्ला केला.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती सापांना खायला देण्यासाठी प्रथम एका प्लेटमध्ये कुजलेले मांस ठेवते. भुकेलेला किंग कोब्रा बाहेर काढताच त्याने आधी मालकावर हल्ला केला. मात्र, त्याने काठीने सापाचे डोके फिरवले आणि खाण्याच्या दिशेने सोडले. कोब्रा लगेच अन्नाकडे सरकला आणि मग एक एक करून मांस गिळू लागला. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.
दरम्यान, किंग कोब्राशी संबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण या व्हिडिओमधील खूपच भयानक आहे.‘कोब्रा जायंट’ नावाच्या यूट्यूब चॅनलने हा भीतीदायक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या चॅनलवर सापांशी संबंधित अनेक व्हिडिओ आहेत. किंग कोब्राने त्याच्या मालकावर हल्ला केल्याचीही माहिती व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट नाही. सोशल मीडियावक प्राण्यांचे असे भयावह व्हिडीओ समोर येत राहतात.