JOIN US
मराठी बातम्या / Viral / 43,000 रुपये सॅलरी, कंपनीने चुकून 1.42 कोटी केले ट्रान्सफर; पठ्ठा राजीनामा देऊन थेट गायब!

43,000 रुपये सॅलरी, कंपनीने चुकून 1.42 कोटी केले ट्रान्सफर; पठ्ठा राजीनामा देऊन थेट गायब!

कर्मचाऱ्याने थोडाही विलंब न करता थेट गायबच झाला.

जाहिरात

शेवटी UPI PIN टाकावा लागेल आणि सेंडवर क्लिक करावं लागेल. अशाप्रकारे विना इंटरनेट UPI Payment करू शकता. हे फीचर केवळ MTNL आणि BSNL युजर्स वापरु शकतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 जुलै : महिन्याच्या शेवटी किंवा काही ठिकाणी सुरुवातीला येणारा सॅलरीचा मेसेज खूप आनंद देऊन जातो. मात्र एका पठ्ठ्याला इतकी जास्त सॅलरी मिळाली की, तो नोकरी सोडून गायबच झाला. हो हे खरंय…ही घटना चिली येथे घडली. येथे एका कंपनीने चुकून आपल्या कर्मचाऱ्याच्या बँक अकाऊंटमध्ये (Bank Account Salary) 5,00,000 पेसो म्हणजे 1.42 कोटी रुपये ट्रान्सफर केलं. मूळात त्या कर्मचाऱ्याची सॅलरी 43,000 हजार होती, मात्र चुकून त्याला 1.42 कोटी रुपये ट्रान्सफर झाले. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिलीमधील प्रसिद्ध कंपनी Conorcio Industrial de Alimentos मध्ये हा पठ्ठ्या काम करीत होता. त्याला महिन्याची 43,000 रुपये सॅलरी होती. मात्र कंपनीकडून मोठी चूक झाली. आणि त्याने कर्मचाऱ्याला त्याच्या सॅलरीच्या 286 पट म्हणजे 1 कोटी 42 लाख रुपये पैसे ट्रान्सफर केलं. ज्यानंतर कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा दिला आणि थेट गायब झाला. कर्मचाऱ्याने स्वत:च सांगितला प्रकार… रिपोर्टनुसार, कर्मचाऱ्याने 30 मे रोजी स्वत: कंपनीच्या डेप्युटी मॅनेजरशी संपर्क केला. आणि त्याला सांगितलं की, त्याला मे महिन्यात अपेक्षेपेक्षा जास्त सॅलरी आली आहे. तेव्हा कंपनीला आपली चूक लक्षात आली. त्यांनी कर्मचाऱ्याला बँकेज जाण्यास सांगितलं. यानंतर पैसे परत करण्यासाठी तोही तयार झाला. आता कंपनीकडून कायदेशीर कारवाई यानंतर कंपनीचं त्याच्यासोबत बोलणं झालेलं नाही. बँकेकडूनही काही सूचना आलेली नाही. 2 जूनला तो आपल्या वकिलासोबत आला आणि राजीनामा देऊ निघून गेला. आता त्याच्याशी काहीच संपर्क होत नाही. त्यामुळे कंपनी त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या