JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO : 180 किमी प्रतितास वेगानं धावणाऱ्या कारवर झोपला तरुण; विचित्र स्टंट भोवला

VIDEO : 180 किमी प्रतितास वेगानं धावणाऱ्या कारवर झोपला तरुण; विचित्र स्टंट भोवला

या तरुणानं 180 च्या स्पीडनं आपली कार पळवली आणि स्वतः कारवर (Car Stunt) जाऊन झोपला. हा व्हिडिओ (Shocking Video) पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 06 सप्टेंबर : अनेकदा जगाला काहीतरी वेगळं करून दाखवण्याच्या नादात आपल्यासोबतच काहीतरी विचित्र घडतं. रशियामधील (Russia) एका तरुणासोबतही असंच घडलं. या तरुणानं 180 च्या स्पीडनं आपली कार पळवली आणि यानंतर स्वतः कारवर (Car Stunt) जाऊन झोपला. हा व्हिडिओ (Shocking Video) पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. तर, पोलिसांनी (Police) त्याची संपूर्ण माहिती काढली आहे. …अन् 20 फूट अजगरानं तीन वेळा केला हल्ला; हादरवून टाकणारा Video आला समोर रशियाचा इन्फ्लुयंसर डेनिल मायसनिकोव यानं भरधाव वेगातील कारवर झोपत भयंकर स्टंट केला. स्वतःचा हा व्हिडिओही त्यानं सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले, कारण स्वतःच जीव अशा प्रकारे कोणी धोक्यात कसं टाकू शकतं, असा प्रश्न सर्वांना पडला. डेनिल मायनिकोव एका भरधान वेगातील कारवर होता. त्यानं या कारवर व्यवस्थित बसून राहण्यासाठी दोरी आणि टेपचा सहारा घेतला होता. टेपच्या सहाय्यानं त्यानं आपलं संपूर्ण शरीर कारच्या बाहेरच्या भागाला बांधलं होतं. डेनिलनं या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला.

पाकिस्तानी न्यूज अँकरचे प्रश्न ऐकून पाहुण्यांना आवरेना हसू, पाहा VIDEO इन्स्टाग्रामवर डेनिल याचे तब्बल 8 लाख फॉलोअर्स आहेत. डेनिलनं अपलोड केलेला हा व्हिडिओ तब्बल 2.5 लाख लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओमध्ये डेनिलनं स्वतःला टेपनं बांधतानाही दाखवलं आहे. यानंतर त्यानं मित्रांना 112 किलोमीटर प्रती तासाच्या स्पीडनं गाडी चालवण्यासाठी सांगितलं. गाडी कोणीतरी दुसरंच चालवत आहे. हा प्लॅन करून शूट केलेला व्हिडिओ आहे. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या व्यक्तीविरोधात तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या