नवी दिल्ली 28 जानेवारी : मित्रांमध्ये मस्ती आणि मस्करी सुरूच असते. मात्र, अनेकदा या गोष्टींमध्ये काही लोक हद्द पार करतात. अशीच एक घटना (Weird Incident) नुकतीच जपानमधून (Japan News) समोर आली आहे. ही घटना खरंतर काही महिन्यांपूर्वीची आहे. मात्र आता तिचा व्हिडिओ पुन्हा एकदा शेअर केला जात आहे. व्हायरल व्हिडिओ (Shocking Viral Video) जपानच्या एका करी रेस्टॉरंटमध्ये कैद केला गेला आहे. यात जेवण करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असं काही झालं, जे पाहून तुम्हीही हैराण व्हाल. मिळालेल्या माहितीनुसार, जपानच्या फुकुओका येथील एका रेस्टॉरंटमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला आहे. यात एका व्यक्तीने आपल्यासोबत जेवण करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या जेवणात प्यूबिक हेअर टाकला (Pubic Hair in Meal). हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच, सगळेच हैराण झाले. EBC नावाच्या लोकल वेबसाईटच्या वृत्तानुसार, ही घटना तेव्हा घडली जेव्हा जेवणाच्या ब्रेकमध्ये कर्मचारी सोबत बसून जेवण करत होते. तेव्हाच एका व्यक्तीने आपल्या पॅन्टमध्ये हात घातला आणि आपल्या प्रायव्हेट पार्टचा एक केस तोडण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. मात्र दुसऱ्यांदा केसाचा एक तुकडा त्याच्या हातात आला. Shocking! आपल्या मासिक पाळीचं रक्त पिते ही महिला; केला विचित्र दावा या व्यक्तीने लगेचच आपला केस आपल्या सहकाऱ्याच्या जेवणाच्या प्लेटमध्ये टाकला. यानंतर त्याने म्हटलं की तो जेवणात स्पेशल मसाला मिसळत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्यक्तीकडे याबाबत चौकशी केली असता त्याने म्हटलं, की ते त्याचंच जेवण होतं. हे जेवण रेस्टॉरंटमध्ये कोणाला दिलं गेलं नाही. यामुळे कोणालाही या गोष्टीबाबत तक्रार नसावी. व्हिडिओ या व्यक्तीच्याच मित्राने मस्करीत पोस्ट केला. यानंतर हा व्हिडिओ डिलिटही केला गेला. इथून कोणीतरी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला. यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. व्हिडिओवर रेस्टॉरंटमधीलच एका दुसऱ्या कर्मचाऱ्याची नजर पडली आणि त्याने हेडक्वारटरमध्ये याची तक्रार केली. यानंतर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली गेली आणि त्याची पोलखोल झाली. यानंतर चौकशीत या व्यक्तीने सांगितलं की मी निर्दोष आहे आणि फक्त माझ्या मित्रांसोबत मस्करी करत होतो.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेस्टॉरंटने यासाठी माफी मागितली आहे. रेस्टॉरंटने म्हटलं की कर्मचाऱ्याचं हे कृत्य चुकीचं आहे, मात्र यात त्यांची काहीही चूक नाही. हे प्रकरण समोर येताच त्यांनी कर्मचाऱ्याला कामावरुन काढलं.