मंगळुरू, 13 जानेवारी : दबंग आणि सिंघम फिल्ममधील पोलिसाच्या स्टाईलचे तर तुम्ही दिवाने आहातच. अशाच एका पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. अगदी दबंग, सिंघमप्रमाणेच या पोलिसानेही भारी काम केलं आहे. एका चोराचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्याला पकडलं आहे (Police catch the thief). यावेळी हा पोलीस जखमीही झाला आहे (Police catch the thief video). अगदी सिनेमात दाखवतात तसा चोर-पोलिसांचा थरारक पाठलाग प्रत्यक्षात फार कमी वेळा पाहायला मिळतो. चोर-पोलिसात सिनेस्टाईल थरार रंगला. हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला, जो व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या पोलिसाचं कौतुक केलं जातं आहे. चोर मोबाईल चोरून पळत होता. तेव्हा पोलिसाने त्याचा पाठलाग केला. जोपर्यंत चोर हाताला लागत नाही तोपर्यंत पोलीस त्याचा पाठलाग करत राहिला. चोराला पोलिसाने रस्ते, गल्ल्यांमध्ये पळव पळवलं, आपणही त्याच्या मागे वेगाने धावला आणि अखेर त्याला गाठून रस्त्यावरच त्याला आडवं पाडलं. त्याच्यावर बसून त्याला घट्ट धरून ठेवलं. काही वेळातच इतर पोलीस तिथं पोहोचले आणि शेवटी त्या चोरट्याला पकडण्यात आलं.
हे संपूर्ण दृश्य तिथं उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एखाद्या फिल्मचा शूटिंग व्हिडीओ असावा असं वाटेल पण असं नाही. हा रिअल लाइफ सिंघमचा व्हिडीओ आहे. चोराला पकडताच त्याच्याकडून मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. हे वाचा - Yuck! तंदुरी रोटीवर थुंकला कुक; हॉटेलमधील किळसवाणा VIDEO VIRAL या पोलिसाची सर्वत्र चर्चा होते आहे. मंगळुरूचे पोलीस आयुक्त शशी कुमार यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनीही या पोलिसाचं कौतुक केलं आहे.