JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO: बाईक रेसदरम्यान झाला भयंकर अपघात; पुढे रायडरने जे काही केलं ते पाहून येईल अंगावर काटा

VIDEO: बाईक रेसदरम्यान झाला भयंकर अपघात; पुढे रायडरने जे काही केलं ते पाहून येईल अंगावर काटा

व्हिडिओमध्ये दिसतं की या रेसमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकाचा भयंकर अपघात होतो. वळणावरती त्याचं दुचाकीवरील नियंत्रण सुटतं आणि तो खाली कोसळतो

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 07 एप्रिल : हौसेला मोल नाही, हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. इतकंच नाही तर याची अनेक उदाहरणंही तुम्ही पाहिली असतील. काही लोकांसाठी त्यांची हौस सगळ्यात महत्त्वाची असते. त्यांना आपल्या हौसेपुढे जगातलं इतर काहीच दिसत नाही. यातील काही लोकांची हौस चांगली आणि लोकांना प्रेरणा देणारी असते. तर काहींची आवड मात्र अतिशय अजब आणि हैराण करणारी असते. तुम्ही टीव्हीवर अनेकदा बाईक रेस (Bike Race) पाहिली असेल. यात सहभागी होणारा रायडर्स इतक्या भयानक पद्धतीने गाडी चालवतात की ते पाहूनच अंगावर काटा येतो.

मंदिरात चोरी करण्यासाठी गेलेल्या चोराला मिळालं कर्माचं फळ; शेवटी पोलिसांना बोलावून वाचवावा लागला जीव, VIDEO

त्यांना पाहूनच भीती वाटू लागते. अशा रेसमध्ये अनेकदा भयंकर दुर्घटनाही घडल्याचं पाहायला मिळतं. रेसदरम्यान झालेल्या अशाच एका अपघाताचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Accident Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की हौस आणि जिद्द अतिशय मोठ्या गोष्टी आहेत.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये दिसतं की या रेसमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकाचा भयंकर अपघात होतो. वळणावरती त्याचं दुचाकीवरील नियंत्रण सुटतं आणि तो खाली कोसळतो. त्याने संपूर्ण सुरक्षेसह रेसमध्ये भाग घेतल्याने त्याला यात कोणतीही गंभीर दुखापत होत नाही. मात्र अपघातानंतरही त्याने जे काही केलं, ते पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल.

सोफ्यावर बसल्यानंतर जाणवली हालचाल; उशी उचलताच बाहेर आला 7 फूट लांब विषारी साप, Shocking Video

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अपघातानंतरही आपण मागे राहू नये म्हणून तो पटकन उठतो. यानंतर एक भिंत पार करतो आणि मग ट्रॅकवर जोरात धावत जाऊन दुसरी बाईक घेतो. यानंतर तो रेसमध्ये पुन्हा सहभागी होण्यासाठी आपली गाडी पळवतो. त्याची ही जिद्द पाहून तिथे उपस्थित सगळेच अवाक होतात. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, की ‘छंद एक अतिशय मजबूत अशी भावना आहे.’ अवघा 1 मिनिट 7 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 6 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केली आहे. लोकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या