JOIN US
मराठी बातम्या / Viral / अरे बापरे! दारूच्या नशेत माशांऐवजी महाकाय अजगराला धरलं आणि पुढे भयंकर घडलं; Watch Video

अरे बापरे! दारूच्या नशेत माशांऐवजी महाकाय अजगराला धरलं आणि पुढे भयंकर घडलं; Watch Video

मासे पकडायला गेलेल्या व्यक्तीने अजगराला धरून त्याला आपल्या शरीराभोवती गुंडाळलं. त्यानंतर अजगराने त्याला विळखा घातला.

जाहिरात

मासेमारी करताना हाताला लागला अजगर.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची, 10 नोव्हेंबर : मासे पकडताना एखादा दुसरा प्राणी किंवा काही ना काही हाताला विचित्र लागल्याची प्रकरण तुम्हाला माहिती असतील. पण माशांऐवजी हा दुसरा प्राणी अजगर असेल तर… असंच घडलं ते एका व्यक्तीसोबत. मासे पकडायला गेलेल्या या व्यक्तीच्या गळाला मासा लागला की नाही माहिती नाही पण त्याच्या गळ्यात मात्र भलामोठा अजगर मात्र अडकला. झारखंड मधील ही धक्कादायक घटना आहे. ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील खुर्द गावात राहणारी ही 55 वर्षांची व्यक्ती. बिरजलाल राम भुइया असं या व्यक्तीचं नाव आहे. बिरजलाल मासे पकडण्यासाठी नदीवर गेला. पाण्यात उतरल्यानंतर त्याला भलामोठा अजगर दिसला. आता आपल्याला साधा छोटा साप दिसला तरी घाम फुटतो मग भलामोठा अजगर समोर आला तर तुम्ही काय कराल? साहजिकच कुणीही घाबरेल आणि अजगरापासून दूर पळून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करेल. पण या व्यक्तीने मात्र त्याच्या उलट केलं आणि तेच त्याला महागात पडलं. हे वाचा -  डोळ्याची पापणी लवण्याआधी अजगराने अख्खं हरिण गिळलं; शिकारीचा थरारक LIVE VIDEO मजेमजेत त्याने अजगराला आपल्या हातात धरलं आणि शरीराभोवती गुंडळालं. त्याच्यासोबत खेळ केला. आता अजगर तो अजगर… त्यानेही आपलं खतरनाक रूप दाखवलं. व्यक्तीने आपल्या शरीराभोवती गुंडाळल्यानंतर अजगरानेही त्याच्या मानेभोवती आपला विळखा घट्ट केला. त्यानंतर मात्र अजगरासोबत खेळ करणारी ही व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी धडपडू लागली. मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडू लागली.

त्याचा आवाज ऐकून त्याचा मुलगा धावत आला. त्याने आपल्या काही मित्रांच्या मदतीने आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. सर्वजण मिळून व्यक्तीभोवतीचा अजगराचा विळखा सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. हे वाचा -  Video: कुत्र्याला जिवंत गिळणार अजगर, इतक्यात असं काही घडलं, पाहून अंगावर येईल शहारा व्हिडीओत तुम्ही पाहू शकता अजगराने कशा पद्धतीने या व्यक्तीला जखडलं आहे आणि मुलं त्याची विळख्यातून सुटका करण्याचा प्रयत्न करत आहेत. बऱ्याच तासांनंतर त्यांनी त्याची अजगराच्या तावडीतून सुटका केली. पण तो गंभीर जखमी झाला.

संबंधित बातम्या

ही व्यक्ती दारू प्यायली होती आणि नशेत ती मासे पकडायला गेली. तेव्हा त्याने मासे पकडणं सोडून अजगराला पकडलं आणि ते त्याला चांगलंच महागात पडलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या