JOIN US
मराठी बातम्या / Viral / माणसाला जिवंत गिळताना दिसला अवाढव्य अजगर; VIDEO पाहूनच अंगाचं पाणी पाणी होईल

माणसाला जिवंत गिळताना दिसला अवाढव्य अजगर; VIDEO पाहूनच अंगाचं पाणी पाणी होईल

अजगराचा माणसावरील हल्ल्याच्या शिकारीचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात

अजगराचा तरुणावर भयंकर हल्ला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 डिसेंबर :  अजगराचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एखाद्या प्राण्याची शिकार करतानाही तुम्ही अजगराला पाहिलं असेल. पण  माणसाची शिकार करताना अजगराला पाहणं म्हणजे दुर्मिळच. असे सीन तुम्ही फिल्ममध्ये पाहिले असतील पण प्रत्यक्षात नाही. पण अशीच माणसाची शकार करणाऱ्या अजगराचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. अजगराची शिकार करण्याची पद्धत तर तुम्हाला माहिती असेलच. शिकाऱ्याभोवती वेटोळे घालून त्याला अख्ख्याच्या अख्खं जिवंत गिळतो. प्राण्यांची शिकार करताना अजगराला पाहूनच आपल्याला धडकी भरते. या प्राण्यांच्या जागी माणूस… विचारही नकोसा वाटतो. पण असाच व्हिडीओ चर्चेत आला आहे. हे वाचा -  डोळ्याची पापणी लवण्याआधी अजगराने अख्खं हरिण गिळलं; शिकारीचा थरारक LIVE VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक महिला एका लहान बाळाला घेऊन दिसते आहे. एक व्यक्ती एका मोठ्या बॉक्सजवळ आहे. महिला मुलाला घेऊन त्या बॉक्सजवळ जाते. तितक्यात त्या बॉक्समधून भलामोठा अजगर बाहेर येतो आणि बॉक्सजवळ बसलेल्या व्यक्तीवर हल्ला करतो. अजगर त्या व्यक्तीचा चेहराच आपल्या जबड्यात धरतो. महिला घाबरते आणि मोठमोठ्याने ओरडून सर्वांना मदतीसाठी बोलावते. काही लोक तिथं धावत येतात. व्यक्ती आपल्या दोन्ही हातांनी त्या अजगराला पकडून ठेवते. इतर लोकही त्या व्यक्तीच्या अजगराच्या तावडीतून सुटका करण्यासाठी सर्वजण धडपड करतात. पण अजगराने त्या व्यक्तीचं तोंड आपल्या जबड्यात इतकं घट्ट पकडलं आहे की इतके लोक खेचूनही निघत नाही आहे. एक व्यक्ती तर अजगराच्या शेपटीवर वारही करते. पण काहीच फरक पडत नाही. हे वाचा -  अरे बापरे! दारूच्या नशेत माशांऐवजी महाकाय अजगराला धरलं आणि पुढे भयंकर घडलं; Watch Video व्हिडीओच्या शेवटपर्यंत या व्यक्तीचं तोंड अजगराच्या जबड्यातून बाहेर पडल्याचं दिसत नाही. त्यामुळे त्याचं शेवटी काय झालं याची माहिती नाही. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @laris_a9393 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वांनाच धडकी भरली आहे. त्यावर बऱ्याच शॉकिंग कमेंट येत आहेत.

संबंधित बातम्या

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या