JOIN US
मराठी बातम्या / Viral / वाचवा...वाचवा... वाचवा... पुणेकर तरुणाची बसमध्ये बोंबाबोंब; त्याच्यासोबत काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

वाचवा...वाचवा... वाचवा... पुणेकर तरुणाची बसमध्ये बोंबाबोंब; त्याच्यासोबत काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

पुण्यातील पिंपरी-चिंचवडच्या बसमध्ये गोंधळ घालणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

बसमध्ये तरुणाचा राडा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 15 ऑक्टोबर : ट्रेन प्रवास असो किंवा बस प्रवास… या सार्वजनिक गाड्यांमधील भांडणं तशी नवी नाहीत. म्हणजे धक्का लागला म्हणून किंवा जागेवरून वाद होतातच. पण सध्या एक बसचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पुण्यात एका तरुणाने बसमध्ये अक्षरशः राडा घातला आहे. मला वाचवा… वाचवा… वाचवा… म्हणत तरुणाने बस अक्षरशः हादरवून सोडली. या तरुणासोबत बसमध्ये नेमकं असं झालं तरी काय, की तो बसमध्ये मोठमोठ्याने ओरडून मदत मागू लागला? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधील ही घटना आहे. पीएमपीएमएल बसमध्ये प्रवाशी तरुणाने गोंधळ घातला. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओ तरुण बस ड्रायव्हरच्या जवळ उभा आहे आणि ड्रायव्हरशी वाद घालत, तो मोठमोठ्याने मदतीसाठी ओरडताना दिसतो. यावरून तरुण आणि ड्रायव्हरमध्ये काहीतरी झालं आहे हे स्पष्ट होतं. पण नेमकं काय ते आता पाहुयात. हे वाचा -  कंडक्टरशी हुज्जत, बसमध्ये आजीबाईने घातला गोंधळ; तरी VIDEO पाहून वाटेल कौतुक व्हिडीओतील संभाषण तुम्ही ऐकाल तर तरुण बसचालकाशी हुज्जत घालताना दिसतो आहे. मध्येच तो ओरडू लागतो वाचवा… वाचवा… मला वाचवा… बस ड्रायव्हर मला त्रास देतो आहे, मला बसमधून उतरू देत नाही. असं मोठमोठ्याने ओरडतो. इतकंच नव्हे तर बस ड्रायव्हर आपलं अपहरण करतो आहे, असा आरोपही तो करतो. बसमधील एक प्रवासी त्याच्या जवळ जाऊन त्याला शांत कऱण्याचा प्रयत्न करतो पण तो त्याचंही ऐकत नाही. त्याचा असा गोंधळ पाहून रस्त्यावरून जाणारे इतर नागरिक आणि गाडीचालकही थांबतात. हे वाचा -  VIDEO - नव्या बाईकशेजारी उभी राहिली वाईफ; नवऱ्याने जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही त्याच्या भांडणाचं कारण म्हणजे बस ड्रायव्हरने त्याला जिथं उतरायचं होतं, तिथं उतरू दिलं नाही. ड्रायव्हरला तो गाडी थांबवून दरवाजा उघडायला सांगतो. पण ड्रायव्हर स्टॉप निघून गेला आणि आता पुढचा स्टॉप येईपर्यतं गाडी थांबवणार नाही हे स्पष्टपणे सांगतो.

संबंधित बातम्या

तरुणाने इतका गदारोळ केला पण तरी त्याचा काहीच फायदा झालेला या व्हिडीओत दिसत नाही. इतक्या आकांततांडवानंतरही जिद्दी ड्रायव्हरनेही बस थांबवली नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरलं नसेल हे नक्की.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या