JOIN US
मराठी बातम्या / Viral / 6 फेऱ्यानंतर मंडपातून उठून गेली नवरी; धरणे आंदोलनाला बसलेल्या नवरदेवाच्या कुटुंबीयांची अजब मागणी

6 फेऱ्यानंतर मंडपातून उठून गेली नवरी; धरणे आंदोलनाला बसलेल्या नवरदेवाच्या कुटुंबीयांची अजब मागणी

सहा फेरे घेतल्यानंतर शेवटच्या फेऱ्यावेळी नवरीनं (Bride) लग्नास (Marriage) नकार दिला (Bride Refused To Marry) . यानंतर एकच गोंधळ उडाला. आता वराती नवरीबाईच्या घराबाहेरच धरणे आंदोलनाला बसले आहेत.

जाहिरात

या गावात नवरीऐवजी नवरा नांदतो सासरी.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची 01 जुलै: भारतात आजकाल लग्नाचा (Wedding) सीझनच सुरू आहे. यादरम्यान अनेकदा विचित्र कारणांमुळे वरात माघारी गेल्याच्या किंवा लग्न मोडल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात. असंच एक प्रकरण झारखंडच्या रांचीमधून समोर आलं आहे. इथे सहा फेरे घेतल्यानंतर शेवटच्या फेऱ्यावेळी नवरीनं (Bride) लग्नास (Marriage) नकार दिला (Bride Refused To Marry) . यानंतर एकच गोंधळ उडाला. आता वराती नवरीबाईच्या घराबाहेरच धरणे आंदोलनाला बसले आहेत. ही घटना रांचीच्या धुर्वा ठाण्याच्या क्षेत्रातील मौसीबाडा येथील आहे. इथे एका लग्नादरम्यान नवरी अचानक मंडपात उठून गेल्यानं गोंधळ उडाला. यानंतर नवरदेवाच्या (Groom) घरातील लोक नवरीच्या घराबाहेर धरणे आंदोलनाला बसले. त्यांची अशी मागणी आहे, की एकतर नवरीनं लग्न करून वरातीसोबत सासरी यावं किंवा लग्नासाठी झालेला खर्च मुलीकडच्या लोकांनी त्यांनी लगेचच परत द्यावा. वृत्तपत्रात छापलेला BF सोबतचा एक फोटो ठरला टर्निंग पॉईंट; IAS चांदनीचा किस्सा लग्नाला नकार दिल्यानंतर दोन्ही पक्षातील लोकांनी नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिनं ऐकलं नाही. नवरीनं म्हटलं, की ती आपला निर्णय बदलणार नाही. आपण कोणत्याही परिस्थितीत हे लग्न करू शकत नसल्यचं तिनं स्पष्ट केलं. झोपेतच चिमुकल्याच्या तोंडून निघालेले ते शब्द ऐकून नेटकरी भावुक; पाहा VIRAL VIDEO 29 जून रोजी विनोद लोहरा आणि चंदा लोहरा यांचं लग्न होणार होतं. ठरल्याप्रमाणे २९ जूनला विनोद वरात घेऊन चंदाच्या घरी आला. सुरुवातीला लग्नाचे सर्व विधी परंपरेप्रमाणे पार पडले. वरमाळेचा कार्यक्रमही झाला. दोघांनी सहा फेरेही घेतले मात्र सातव्या फेऱ्याआधीच नवरीनं या लग्नास नकार दिला. नवरीबाईच्या या निर्णयानं एकच गोंधळ उडाला. आपल्याला नवरदेव आवडला नसल्यानं लग्न करू शकत नसल्याचं नवरीनं म्हटलं. नवरीच्या वडिलांचं असं म्हणणं आहे, की मुलगी लग्नासाठी तयार नाही आणि मुलाकडचे लोक खर्च झालेले पैसे मागत आहेत. मात्र, त्यांच्याकडे पैसे नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या