प्रतीकात्मक फोटो
वॉशिंग्टन 30 मार्च : एक व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडचं लोकेशन ट्रॅक करण्यासाठी Apple वॉच वापरत होता. अमेरिकेतील नॅशविल, टेनेसी येथे राहणार्या या व्यक्तीने Apple वॉच आपल्या गर्लफ्रेंडच्या कारच्या चाकाला जोडलं आणि तिचं लोकेशन ट्रॅक करण्यासाठी थर्ड-पार्टी ट्रॅकिंग अॅप वापरलं. सध्या त्याच्या या कारनाम्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे (Boyfriend Track Location with help of Apple Watch). VIDEO : चवताळलेल्या रेड्याने शिंगावरच घेतली प्रवाशांनी भरलेली कार; पुढे जे घडलं ते पाहूनच हादराल टेलिव्हिजन स्टेशन WSMV4 च्या माहितीनुसार, 29 वर्षीय लॉरेन्स वेल्च याच्यावर वाहनाला इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग उपकरण जोडल्याचा आरोप आहे. पोलिसांना एक कॉल आला होता, ज्यामध्ये तरुणीने आपल्या जीवाला प्रियकराकडून धोका असल्याचं सांगितलं होतं. पीडितेने दावा केला, की वेल्चने तिला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी Life360 नावाच्या अॅपद्वारे प्रेयसीला ट्रॅक करत होता. पीडितेने पोलिसांना सांगितलं की ती आणि तिचा प्रियकर वेल्च यांनी एकमेकांच्या लोकेशन्सचा मागोवा घेण्यासाठी Life360 चा वापर केला, परंतु वेल्चपासून सुटका करून घेण्यासाठी फॅमिली सेफ्टी सेंटरमध्ये जाण्यापूर्वी तिने अॅपवर ट्रॅकिंग बंद केले. असं करुनही पीडितेच्या लोकेशनचा मागोवा घेत आरोपी कौटुंबिक सुरक्षा केंद्रात पोहोचला, परंतु त्याने इमारतीत प्रवेश केला नाही, असं पोलिसांनी सांगितलं. तिथे जाऊन तो गाडीच्या चाकांकडे पाहू लागला आणि जेव्हा अधिकारी तिथे पोहोचले तेव्हा त्यांना गाडीच्या चाकात Apple वॉच दिसलं. अधिकारीही हे पाहून हैराण झाले की तरुणाने ट्रॅकिंगसाठी वॉट कुठे फीट केलं आहे. तरुणीने एका मिनिटांत खाल्लं इतकं चिकन, Guinness World Records मध्ये झाली नोंद पीडितेने तिचं Life360 अॅप बंद केलं तेव्हाही वेल्चने तिचं Apple Watch सक्रिय ठेवलं. त्यानंतर, त्याने आपल्या गर्लफ्रेंडचं लोकेशन ट्रॅक करण्यासाठी अॅपचा वापर केला. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी हेरगिरी आणि लोकांचा पाठलाग करण्याच्या बहुतेक घटनांमध्ये एअरटॅग वापरण्यात आलं होतं. अॅपलकडेही अशा अनेक तक्रारी आल्या, ज्यात लोकांनी सांगितलं की त्यांना एअरटॅगद्वारे फॉलो केलं जात आहे. यानंतर Apple ने AirTags मध्ये अँटी-स्टॉकिंग फीचर्स आणली, परंतु आता असं दिसतं की Apple वॉचवर ट्रॅकिंग मर्यादित करण्याबद्दल देखील विचार करावा लागेल.