नवी दिल्ली 30 ऑगस्ट : कोणत्याही व्यक्तीसाठी लग्न हा जीवनातील अत्यंत खास क्षण असतो. मात्र, राजस्थानच्या (Rajasthan) चित्तौडगढ (Chittorgarh) येथील एका मुलीनं 12 हून अधिक मुलांसोबत लग्न केलं (Girl Married With More Than 12 Grooms). लग्नानंतर (Marriage) काही दिवसातच ती पळून जात असे. पोलिसांनी (Police) अजूनही तिनं नेमकी किती जणांसोबत लग्नगाठ बांधली याबाबतचा नेमका आकडा समजू शकला नाही. या मुलीचं नाव नेहा असं आहे. दैनिक भास्करमध्ये आलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी नेहासह तिच्या सोबती सीमा शेख आणि लक्ष्मी यांनाही ताब्यात घेतलं आहे. पोलीस सध्या या तिघींचीही चौकशी करत आहेत. फसवणूक करणाऱ्या या टोळीचं बिंग तेव्हा फुटलं जेव्हा नेहा स्वतः आपल्या आईसोबत ठाण्यात पोहोचली आणि सीमा शेख तसंच साबिर खान आणि लक्ष्मी यांच्याविरोधात आपलं अपहरण केल्याची तक्रार केली. ती मोठ्या प्रयत्नांनतर यातून बाहेर पडल्याचं तिनं सांगितलं. मात्र, जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा समजलं, की यात मुख्य सूत्रधार नेहा हिच असून सीमा शेख, साबिर खान आणि लक्ष्मी तिचे साथीदार आहेत. अखेर ती निर्दयी आई सापडली, बाळाला लाथा-बुक्क्यांनी केली होती मारहाण विशेष बाब म्हणजे नेहाच्या आईला तिच्या या कामाबद्दल काहीही माहिती नव्हती. नेहा वेगवेगळी कारणं सांगून घरातून बाहेर जात असे आणि लग्न करत असे. यानंतर संधी मिळताच ती मुलाच्या घरातून फरार होत असे. नेहा घरातून बाहेर पडताना कधी आपल्या आईला असं सांगायची की ती मैत्रिणीच्या लग्नाला जात आहे तर कधी असं सांगत की मैत्रिणींसोबत फिरायला जात आहे. राज्यात कोविन अॅप हॅक करुन फेक प्रमाणपत्र? महापालिकेची पोलिसात तक्रार एका महिन्याआधी नेहानं जयरामसोबत लग्न केलं होतं. मात्र, यावेळी नेहा नवरदेवाच्या घरातच अडकली आणि इथून बाहेर पडणं जवळपास एक महिना तिला शक्य झालं नाही. यानंतर नेहा जेव्हा घरी पोहोचली तेव्हा तिच्या आईनं विचारलं की कुठे होतीस तेव्हा तिनं सांगितलं की तिचं अपहरण झालं होतं आणि संधी मिळताच ती तिथून पळून आली.