JOIN US
मराठी बातम्या / Viral / बापरे! आकाशात झेपावताच विमानातून उडाल्या ठिणग्या, नंतर जे घडलं ते...; धडकी भरवणारा VIDEO

बापरे! आकाशात झेपावताच विमानातून उडाल्या ठिणग्या, नंतर जे घडलं ते...; धडकी भरवणारा VIDEO

विमान दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 22 सप्टेंबर : सोशल मीडियावर अपघाताचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. रस्ते, रेल्वेप्रमाणे आता विमान दुर्घटनेचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे. विमान आकाशात झेपावताच विमानातून ठिणग्या उडू लागल्या. त्यानंतर पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे. यूएसमधील घटनेचा हा व्हिडीओ आहे. @DEFCONNEWSTV ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ट्विटर पोस्टनुसार यूएसमधील ही घटना आहे. नेवार्क विमानतळावरून या विमानाने टेक ऑफ केलं. Boeing 777-200ER हे विमान नेवार्कहून ब्राझीलला जात होतं. विमान आकाशात झेपावल्यानंतर काही वेळात त्यातून ठिणग्या बाहेर पडू लागल्या. हे वाचा -  चमत्कार! 4 महिन्यांच्या बाळावर कोसळली इमारत; ढिगाऱ्याखाली 30 तासांनंतरही जिवंत, साधं खरचटलंही नाही व्हिडीओत तुम्ही पाहू शकता विमानाच्या मागच्या बाजूला ठिगण्या दिसत आहेत. विमानाच्या पंखातून या ठिगण्या येत होत्या. आता विमान पेट घेतं की की असंच वाटतं. पण सुदैवाने थोड्यावेळाने ठिगण्या कमी होत होत बंद होतात.

संबंधित बातम्या

टेक ऑफच्या दीड तासांनंतर हे विमान पुन्हा नेवार्क विमानतळावर आलं. विमानाचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. कित्येक प्रवाशांचा जीव वाचला. एअरो एक्सप्लोररच्या माहितीनुसार यूनायटेड एअरलाइन्सचं हे विमान नेवार्कहून ब्राझीलच्या साओ पाओलाला जात होतं. हे वाचा -  VIDEO : तोल जाऊन तो ट्रेनखाली पडला, बापाला काही सुचलं नाही म्हणून असा प्रकार केला; पण… व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी विमानातून ठिणग्या का पडल्या असाव्यात याबाबत आपापलं मत व्यक्त केलं आहे, कारणं सांगितली आहेत. तसंच बहुतेकांनी पायलटचं कौतुक केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या