JOIN US
मराठी बातम्या / Viral / प्रयोगशाळेत संशोधक तयार करतात अब्जावधींच्या संख्येत मच्छर, या मागचं कारण ऐकूण थक्क व्हाल

प्रयोगशाळेत संशोधक तयार करतात अब्जावधींच्या संख्येत मच्छर, या मागचं कारण ऐकूण थक्क व्हाल

योजनेनुसार, मोठ्या संख्येने मच्छर अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेटमध्ये सोडले जातील. हे मच्छर अब्ज संख्येत असतील. पण या मच्छरांची एक खास बाबही असेल. हे खास लॅबमध्ये तयार करुन त्यांना पर्यावरणात सोडलं जाईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 एप्रिल : लहानशा मच्छरमुळे अनेक आजार होऊन आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. डास चावल्यास (Mosquitoes Bite) माणसाला हे भारीही पडू शकतं. तरीही एका देशात अब्जावधीच्या संख्येत मच्छर सोडण्याची योजना (Company Planning to Develop Mosquitoes) आखली जात आहे. यासाठी मच्छर चक्क लॅबमध्ये तयार केले (Genetically Modifies Mosquitoes) जात आहेत. यामागचं कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. ब्रिटन बेस्ड कंपनी यासाठी काम करत आहे. योजनेनुसार, मोठ्या संख्येने मच्छर अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेटमध्ये सोडले जातील. हे मच्छर अब्ज संख्येत असतील. पण या मच्छरांची एक खास बाबही असेल. हे खास लॅबमध्ये तयार करुन त्यांना पर्यावरणात सोडलं जाईल.

हे वाचा -  सुंदर दिसण्याच्या नादात भलतंच घडलं; ब्यूटी ट्रिटमेंटमुळे ओठांचा झाला भयंकर ‘फुगा’

मच्छर तयार करण्यामागे काय आहे कारण - सर्वात महत्त्वाचा प्रश्न हे मच्छर का सोडले जाणार आहेत? Oxitec नावाच्या ब्रिटिश कंपनीत जीव वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत एक खास नर मच्छर तयार केला आहे. या मच्छरवर एक खास प्रोटीनही आहे, जे केवळ नर मच्छरांनाच जन्म देऊ शकेल. अशात ज्यावेळी हे मच्छर कॅलिफॉर्नियातील जंगलात सोडले जातील तेव्हा मादी मच्छरांच्याऐवजी तिथे नर मच्छरांची संख्या वाढेल आणि धोकादायक आजार पसरणार नाहीत.

हे वाचा -  सुसाट BMW ने डिव्हाइडर तोडून स्कूटी चालकाला हवेत उडवलं, भयंकर अपघाताचा थरार VIDEO

मादी मच्छर कमी करण्याचा प्लॅन - या संपूर्ण प्रोजेक्टमागे एकच लक्ष्य आहे. एडेस एजिप्टी मच्छर कमी करणं हा उद्देश आहे. हे मच्छर चावल्याने यापासून धोकादायक आजार पसरतात. जीका, चिकनगुनिया आणि यलो फीवरसारखे आजार एडेस एजिप्टी मच्छर चालवल्याने होतात. जेनेटिकली मॉडिफाइड मच्छर जंगलात पोहोचल्याने इतर मच्छरांची ब्रीड कमी होईल. यामुळे धोकादायक मच्छरांची संख्या कमी होईल. या प्रोजेक्टसाठी अमेरिकेतील पर्यावरण संरक्षण एजेन्सीनेही हिरवा झेंडा दाखवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या