लखनऊ, 16 जुलै : उत्तर प्रदेशमधील एका महिलेचा पिटबुल कुत्र्याने जीव घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली. 80 वर्षांच्या या महिलेवर तिच्या पाळलेल्या पिटबुल कुत्र्यानेच हल्ला केला आणि तिचा मृत्यू झाला. यावरून फक्त भटके कुत्रेच नव्हे तर पाळीव कुत्रेही किती खतरनाक ठरू शकतात, हे दिसून येतं. ही महिला तर आपला जीव वाचवू शकली नाही पण तुमच्यावरही श्वानाने असा हल्ला केला तर नेमकं काय करायचं? स्वतःचा जीव कसा वाचवायचा हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Pitbull kill old woman). हाय टू सर्व्हाइव्ह नावाच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात कुत्र्याच्या हल्ल्यापासून बचाव करण्याचे उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये पिटबुल, जर्मन शेफर्ड, डोबरमॅन अशा कुत्र्यांवर लक्ष केंद्रीत कऱण्यात आलं आहे. जगातील सर्वाधिक खतरनाक श्वानांपैकी हे काही श्वान आहेत. जे आपल्या मालकाचाही जीव घेतात (Dog attack survival). 1) व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा कोणत्याही प्रजातीच्या श्वानांना पाळायचं असेल तर मालकानेही स्मार्ट व्हायला हवा. म्हणजे त्याने आपल्या कुत्र्यांना अशा पद्धतीने ट्रेन करायला हवं की तो दुसऱ्या कुणावर हल्ला करणार नाही. तसंच तो घरात असो वा बाहेर तो एका बंदिस्त जागेत असेल किंवा त्याला बांधलेलं असायला हवं. हे वाचा - Dog Video - जिथं चाटला विचित्र जीव तिथं हुंगताच श्वानाचा मृत्यू; काही क्षणातच तडफडून तडफडून झाला मृत्यू 2) जर असा कुत्रा याआधी कुणाला चावला असेल तर लोकांनी त्याच्याजवळ जाऊ नये. 3) स्वतः शांत राहा, मन मजबूत करा. कुत्रा जेव्हा हल्ला करतात तेव्हा माणसांचे हावभाव पाहतात. जर माणूस घाबरला तर त्यांना समजतं. त्यामुळे त्यांना कधीच तुम्ही घाबरलेले आहात हे दाखवू नका. त्याला काठीने किंवा पायाने मारण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यासमोर बिनधास्त उभे राहा जेणेकरून तुम्ही घाबरलेले नाहीत हे त्याला समजेल. तो शांत होईल आणि तिथून निघून जाईल.