व्यक्ती रोज 10 लिटर पाणी प्यायची
नवी दिल्ली, 21 जुलै : शरीर आणि त्वचा हेल्थी राहण्यासाठी भरपूर पाणी प्या असा सल्ला दिला जातो. शरीरात पाण्याची कमरता असेल तर लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे लोक दिवसभरात अनेकवेळा पाणी पिताना दिसतात. मात्र एक अशी घटना समोर आलीय ज्यामुळे तुम्हीही थक्क व्हाल. एक व्यक्ती दिवसभरात चक्क 10 लीटर पाणी प्यायचा नंतर ही समस्या वाढली आणि डॉक्टरांनी चेकअप केल्यावर भलतीच गंभीर समस्या समोर आली. इंग्लंडमधील व्यक्ती जोनाथन प्लमर डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी सांगितले की, ते दिवसातून 10 लिटर पाणी पितात. त्यानंतरही त्यांचा घसा कोरडाच राहतो. हे ऐकल्यानंतर डॉक्टरांना वाटलं की त्या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास असावा. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा असं आढळून आलं की 41 वर्षीय जोनाथनला मधुमेह नाही तर दुसराच आजार आहे. यामुळे डॉक्टर आणि जोनाथन दोघांनाही धक्का बसला.
डॉक्टरांच्या तपासणीत जोनाथनला ब्रेन ट्यूमर झाल्याचं उघड झालं. यामुळे त्याच्या शरीराची यंत्रणा बिघडली गेली. डॉक्टरांनी सांगितलं की, तुमच्या डोक्यात वाटाण्याच्या आकाराचा एक भाग असतो जो तुम्हाला तहान लागल्याचे संकेत देतो. त्याच्या गडबडीमुळे तो रोज तुम्हाला नेहमीपेक्षा 5 पट जास्त पाणी पिण्याचा संदेश देत होता. त्यानंतर जनाथनने ब्रेन ट्युमरचा उपचार घेतला आणि आता तो ट्युमर युक्त आहे. Viral News : इथे लग्न फक्त एका दिवसासाठी होतं, कारण थक्क करणारं दरम्यान, आपण आपल्या शरीरातील छोट्याशा बदलांकडे कधी कधी दुर्लक्ष करतो. मात्र हेच बदल कधी मोठ्या आजारात रुपांतरीत होतील काही सांगू शकत नाही. त्यामुळे थोडंसंही विचित्र किंवा काही बदलत असल्याचं वाटलं तरी लगेच त्याची तपासणी करुन घेणं गरजेचं आहे.